पुण्यातील मेट्रोची भूमिगत चाचणी यशस्वीरीत्या पार पडली आहे. त्यामुळे आता लवकरच पुणेकरांना बोगद्यातून मेट्रो प्रवास करता येणार आहे. शिवाजीनगर ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानकापर्यंत अशी ३ किलोमीटर पर्यन्त मेट्रो धावली आहे. आता मेट्रोच्या सर्व चाचण्या यशस्वी पूर्ण झाल्या आहेत. ही चाचणी ३० मिनिटं घेण्यात आली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका मेट्रो स्थानक ते स्वारगेट या ११.४ किमीच्या मार्गामध्ये शिवाजीनगर ते स्वारगेट हा ६ किमीचा भुयारी मार्ग आहे. टनेल बोअरिंग मशीनच्यामदतीने हे भुयाराचे काम पूर्ण करण्यात आले आहे. ट्रॅक, ओव्हर हेड विद्यूत तारा, सिग्नलिंग आदी भूयारातील कामे पूर्ण करण्यात आली आहेत. रेंजहील डेपो ते रेंजहील उन्नत मेट्रो स्थानक, रेंजहील उन्नत मेट्रो स्थानक ते शिवाजीनगर मेट्रो स्थानक, सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानक अशी ३ किमीची मेट्रोची चाचणी घेण्यात आली. पुणे मेट्रोचा हा तांत्रिक दृष्टया अत्यंत्य महत्वाचा असा टप्पा मानला जातो . पुणे मेट्रोचे ८५ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे अत्यंत्य वेगाने सुरु आहेत.
पुणे मेट्रोची चाचणी मंगळवारी ३ वाजता रेंजहील डेपो येथून सुरु झाली. रेंजहील डेपो ते रेंजहील उन्नत मेट्रो स्थानक अश्या रॅम्प वर वाटचाल करत ट्रेन स्थानकापर्यंत पोहचली. चालकाने या ठिकाणी आपला कक्ष बदलला व मेट्रो ट्रेन रेंजहील उन्नत मेट्रो स्थानक ते शिवाजीनगर भूमिगत मेट्रो स्थानक ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानकातील भूमिगत स्थानकापर्यंत पोहचली. या चाचणीसाठी गेल्या आठवड्यापासून मेट्रोचे ट्रॅक, विद्युत, सिग्नलिंग, देखरेख व संचालन असे सर्व विभाग कार्यरत होते. या चाचणीला ३० मिनिटे वेळ लागला.
हे ही वाचा:
बेळगावमध्ये कन्नड रक्षण वेदिका संघटनेने महाराष्ट्रातील गाड्यांवर केला हल्ला
‘बाबासाहेबांच्या संविधानामुळेचं मी मुख्यमंत्री झालो’
पाकिस्तानशी चर्चा नाहीच, भारताची भूमिका
एक्झिट पोलनुसार गुजरात, हिमाचलमध्ये भाजपाचा बोलबाला
भूमिगत मेट्रो चाचणी ही तांत्रिकदृष्ट्या अत्यंत्य आव्हानात्मक आणि किचकट अशी होती. या चाचणीसाठी पुणे मेट्रोचे कर्मचारी अहोरात्र प्रयत्न करत होते. पुणे मेट्रोचे ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. या चाचणी मुळे आज एक महत्वाचा टप्पा पार पडला असल्याचं पुणे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी म्हटलं आहे.