महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरून खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर षंढ म्हणत टीका केली आहे. या टीकेला शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्याचे समन्स म्हणजे एक प्रकारे आमंत्रणच कर्नाटक सरकारच्या न्यायव्यवस्थेकडून आलं होत. ते पूर्ण करण्याचं धाडस संजय राऊत यांच्यामध्ये नाही न्यायालयाचे कवच असताना सुद्धा ती प्रक्रिया पूर्ण करायला घाबरले मग राऊत किती मोठे षंढ आहेत असे राऊत यांना विचारले तर त्यांना बरे वाटेल का असा सवाल शंभूराज देसाईयांनी राऊत यांना केला आहे. तुमच्या बडबडण्यावरून बाहेरचं वातावरण तुम्हाला सूट होत नाही. पुन्हा आराम करायची वेळ येऊ नये, अशी वक्तव्य टाळावीत असा जोरदार टोला देसाई यांनी राऊत यांना लगावला आहे.
षंढ हा शब्द संजय राऊत यांनी वापरला. राऊत स्वतः कोण आहेत? ज्यांना १५ दिवसांपूर्वी कर्नाटक सरकारच्या कोर्टाकडून समन्स आलं होतं. ते सुद्धा पूर्ण करण्याचं धाडस संजय राऊतांकडे नाही. न्यायालयाचं कवच असतानाही ते कर्नाटकात जायला घाबरले. संजय राऊत तुम्ही साडे तीन महिने आराम करून आला आहात. तुम्हाला बाहेरचं वातावरण सूट होत नाहीत असा टोलाही देसाई यांनी लगावला आहे.
मोठ्याने बोलायचं, बाह्या सावरून बोलायचं, ही राऊत यांची पद्धत बोलायची महाराष्ट्र सहन करणार नाही. संजय राऊत तोंड आवरा. साडे तीन महिन्यांचा आराम करून आलायत. तुमच्या बडबडण्यावरून बाहेरचं वातावरण तुम्हाला सुट होत नाही. पुन्हा आराम करायची वेळ येऊ नये, अशी वक्तव्य टाळावीत, असा सल्लाही शंभूराज देसाई यांनी राऊत याना दिला आहे.
पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली बेळगावला जाणार असल्याचे राऊत म्हणाले आहेत. त्यावर टीका करतांना शंभूराज देसाई यांनी उद्धव ठाकरे यांचं नेतृत्वापेक्षा त्यांना पवार साहेबांचं नेतृत्व मोठं वाटतं का ?असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. अडीच वर्षांपासून आम्ही उद्धव ठाकरे यांना हेच सांगत होतो. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला बांधत आहेत, यावरून आम्ही सतर्क करत होतो असेही देसाई म्हणाले.
हे ही वाचा:
बेळगावमध्ये कन्नड रक्षण वेदिका संघटनेने महाराष्ट्रातील गाड्यांवर केला हल्ला
‘बाबासाहेबांच्या संविधानामुळेचं मी मुख्यमंत्री झालो’
पाकिस्तानशी चर्चा नाहीच, भारताची भूमिका
एक्झिट पोलनुसार गुजरात, हिमाचलमध्ये भाजपाचा बोलबाला
सीमावादाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारंवार केंद्रापुढे महाराष्ट्राची बाजू भक्कमपणे मांडली आहे. याप्रकरणी केंद्राने महाराष्ट्र सरकार व कर्नाटक सरकार या दोघांनी एकत्र आणून त्यांच्यात चर्चा घडवून समेटाने वाद मिटवावा असेही देसाई म्हणाले.