26 C
Mumbai
Wednesday, January 1, 2025
घरक्राईमनामालोखंडी सळीमुळे रेल्वे प्रवाशाचा झाला मृत्यू

लोखंडी सळीमुळे रेल्वे प्रवाशाचा झाला मृत्यू

ट्रेनच्या वेगामुळे ती सळी खिडकीची काच फोडून जवळ बसलेल्या प्रवाशाच्या मानेत भोसकले गेली

Google News Follow

Related

भारतीय रेल्वेमध्ये अनेक अपघात घडतात पण हे अपघात मनाला चटका लावणारा आहे. शुक्रवारी प्रयागराज विभागात लोखंडी सळीमुळे ३२ वर्षीय प्रवाशाचा हृदयद्रावक मृत्यू झाला.
तपास पथकाचा भाग असलेल्या एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले की, “ट्रेन हळूहळू शेवटचे स्टेशन सोडल्यानंतर १०० किमी  वेगाने धावत होती. ट्रेन त्या टोकेरी लोखंडी सळीच्या अगदी बाजूने गेली. ट्रेनच्या वेगामुळे ती सळी खिडकीची काच फोडून जवळ बसलेल्या प्रवाशाच्या मानेत भोसकले गेली “. उत्तर मध्य रेल्वेच्या (एनसीआर) प्रयागराज विभागातील एका स्थानकादरम्यान शुक्रवारी सकाळी ८:४५ च्या सुमारास हा भीषण अपघात झाला. डब्यात बसलेला हरिकेश कुमार दुबे असे पीडित तरुणाचा जागीच मृत्यू झाला. रेल्वे अधिकार्‍याने पुढे सांगितले की, “टोकेरी लोखंडी सळीची धडक इतकी तीव्र होती की त्यामुळे पीडिताच्या मागे बसलेल्या अन्य एका प्रवाशाचा मृत्यू झाला असता. सळी सुमारे १० इंच आत घुसली होती . यात खिडकीच्या काचा तुटल्याने एक महिला प्रवाशी देखील जखमी झाली होती.
घटना घडलेल्या भागात ट्रॅकच्या देखभालीवर एक टीम काम करत असल्याचे मान्य करून एनसीआरचे प्रवक्ते हिमांशू शेखर म्हणाले, “सर्व तांत्रिक बाबींची चौकशी करण्यासाठी विभागीय वाहतूक व्यवस्थापक (आयआरटीएस अधिकारी) यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे.” जीआरपी स्टेशन हाऊस ऑफिसर (अलिगड जंक्शन) सुबोध यादव म्हणाले, “निष्काळजीपणाबद्दल अज्ञात रेल्वे कामगारांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. आयपीसी कलम ३०४-ए (निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्यामुळे) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.” पीडितांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत सुध्या करण्यात आली आहे.
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा