भारतीय नौदलाने आश्वासन दिल्याप्रमाणे ‘आत्मनिर्भर’ भारत बण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्यातच प्रथम महिला अग्निवीरांना नौदलामध्ये सहभागी करून घेतले आहे. अशी माहिती नौदल प्रमुख ऍडमिरल प्रमुख आर. हरी कुमार यांनी दिली. या संपूर्ण अग्निवीर योजनेतर्गत ३००० महिला अग्निवीरांना सहभागी झाले आहेत. त्यापैकी ३४१ अग्निवीर प्रथम नौदलात सामील करून घेतले आहे. त्याच प्रमाणे पुढील वर्षापासून महिला अधिकाऱ्यांचा सुद्धा समावेश करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे या ३४१ महिला अग्निवीरांना नौदलदिनी सेवेत रुजू करण्यात आले आहे. तसेच नौदल दिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेमध्ये नौदल प्रमुख आर. हरी कुमार म्हणाले, आता नौदलातील सर्व शाखा सर्वांसाठी खुल्या असतील. त्याच प्रमाणे २०२३ पर्यत सर्व शाखांमध्ये महिला अधिकाऱ्यांचा सुद्धा समावेश करून घेण्यात येणार आहे. तसेच नौदल प्रमुख हरी कुमार यांनी सरकारला आश्वासन दिले आहे की. २०४७ पर्यत नौदल आत्मनिभर होईल.
हे ही वाचा :
जुळ्या बहिणींशी लग्न करणं तरुणाला भोवणार
ईडीकडून अकरा कोटींची सुपारी जप्त
व्यवसायातील नुकसानीमुळे ताज हॉटेलच्या १०व्या मजल्यावरून त्याने मारली उडी
जुळ्या बहिणींचा नवरा मात्र एकच! आहे की नाही कमाल?
तसेच हिंद महासागरातील चीनच्या खुरापतीवर नौदल बारीक लक्ष्य ठेवून आहे. तर भारत-चीनमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत ही आपले स्त्रोत आणखी मजबूत करत आहेत. अशी विधान नौदल प्रमुख आर.हरी कुमार यांनी केले. तसेच चीनच्या खुरापती वर लक्ष्य ठेवण्यासाठी अमेरिकेकडून ३ बिलियन डॉलर खर्च करून एमक्यु-९ बी प्रिडेटर ड्रॉन खरेदी करण्यात येणार आहेत.