24 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरविशेषव्यवसायातील नुकसानीमुळे ताज हॉटेलच्या १०व्या मजल्यावरून त्याने मारली उडी

व्यवसायातील नुकसानीमुळे ताज हॉटेलच्या १०व्या मजल्यावरून त्याने मारली उडी

पोलिसांनी अपमृत्यूची केली नोंद

Google News Follow

Related

व्यवसायात झालेल्या नुकसानीमुळे दक्षिण मुंबईतील हॉटेल ताजच्या १०व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या इसमाला आपल्या व्यवसायात प्रचंड नुकसान झाले होते. त्याचा व्यवसाय दुबईत होता. शाहरुख इंजीनियर असे त्याचे नाव आहे.

पोलिसांनी यासंदर्भात अपमृत्यूची नोंद केली आहे. या शाहरुख नावाच्या व्यक्तीचे वय ५८ होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १०व्या मजल्यावरून उडी मारल्यानंतर तो चौथ्या मजल्यावरील बाल्कनीत पडला. यातील मयत इसम शाहरुख इंजिनिअर ,वय ५८ वर्षे, हॉटेल ताज वेलिंग्टन कुलाबा मुंबई येथे रूम नंबर १००५ अर्थात १० वा मजला येथे राहण्यास होते. ते दिनांक २ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता चौथ्या मजल्यावरील रूम नंबर ४०५ च्या बाल्कनीत अत्यवस्त अवस्थेत सापडला. हॉटेल ताज वेलिंगटनच्या कर्मचाऱ्यांनी त्यास बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता कर्तव्यावरील डॉक्टरांनी त्यास दाखल करण्यापूर्वीच मयत घोषित केले. शाहरुख इंजिनीअर यांनी ते राहत असलेल्या रूम नंबर १००५, १० वा माळा येथील बाल्कनीतून उडी मारल्याचे प्राथमिक तपासात दिसत आहे.

हे ही वाचा:

श्रद्धाच्या शरीराचे तुकडे करण्यासाठी आफताबने वापरले चिनी बनावटीचे हत्यार

जुळ्या बहिणींचा नवरा मात्र एकच! आहे की नाही कमाल?

‘माझे ठाणे’ ही भावना मनात ठेवून काम करा!

फ्रान्सिस झेवियर: गोव्यामधील ख्रिश्चन धर्मप्रसाराचा क्रूर चेहरा

शाहरुख इंजिनिअर हे दिनांक २७ नोव्हेंबर रोजी दुबई येथून त्यांची आई नामे कटायुन यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हॉटेल ताज वेलिंग्टन, मुंबई येथे आले होते. मयत शाहरुख इंजिनीअर यांचे वडील सायरस इंजिनिअर तसेच बहीण तायुनाज मर्चंट यांचे जबाब घेतले असता त्यांनी शाहरुख याची दुबई येथे कार्बोनिक इंटरनॅशनल नावाची कंपनी असून कंपनीच्या व्यवसायात झालेल्या नुकसानामुळे ते मागील काही दिवसांपासून तणावात असल्याचे त्यांनी सांगितले आहे. सदर इसमाच्या मृत्युबाबत त्यांचा कोणावरही संशय अथवा तक्रार नसल्याचे त्यांनी आपल्या जबाबात सांगितले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा