25 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरविशेषजुळ्या बहिणींचा नवरा मात्र एकच! आहे की नाही कमाल?

जुळ्या बहिणींचा नवरा मात्र एकच! आहे की नाही कमाल?

अत्यंत थाटात विवाहसोहळा झाला संपन्न

Google News Follow

Related

सोलापूर जिल्ह्यातील अकलूज (ता. माळशिरस) येथे एक अनोखा विवाहसोहळा पार पडला. सर्वसाधारणपणे वधू आणि वर हेच एकमेकांना वरमाला घालून विवाहबंधनात अडकतात, पण या लग्नात चक्क दोन मुलींनी एकाच वराला वरले. त्यामुळे या विवाहाची सर्वत्र चर्चा होत आहे. विशेष म्हणजे धूमधडाक्यात आणि घरच्यांच्या पूर्ण सहमतीने हा विवाह झाला.

अकलूज येथे झालेल्या या विवाहात या जुळ्या बहिणींनी एकाच मुलाशी विवाह केला. अकलूज वेळापूर रोडवरील गलांडे हॉटेल येथे हा विवाहसोहळा पार पडला.

अतुल हा या माळशिरस तालुक्यातील असून त्याचा मुंबईत व्यवसाय आहे. ट्रॅव्हलचा त्याचा हा व्यवसाय असून त्याने मुंबईतील या जुळ्या बहिणींशी विवाह केला. रिंकी आणि पिंकी अशी या दोन मुलींची नावे असून काही महिन्यांपूर्वी त्यांची आई आजारी असताना या युवकाने त्यांच्या आईची पूर्ण काळजी घेतली. त्यातूनच त्या मुलींचे त्या मुलावर प्रेम जडले. शेवटी त्यांनी त्याच्याशी विवाह करण्याचे ठरले.

हे ही वाचा:

फडणवीसांच्या प्रयत्नांना आले यश, उपकरप्राप्त इमारतींचा होणार पुनर्विकास

‘माझे ठाणे’ ही भावना मनात ठेवून काम करा!

कोरियन मुलीला ‘या’ दोन भारतीय मुलांनी केली होती मदत

कांदिवलीतील शाळेत विद्यार्थ्याने दुसऱ्या मुलावर केला चाकुने हल्ला

या दोन्ही मुली उच्चविद्याविभूषित असून त्यांचे इंजीनियरिंगचे शिक्षण पूर्ण झालेले आहेत. दोघीही आयटी कंपनीत नोकरीस आहेत. दोघींचे शिक्षणही एकत्र झालेले आहे. जुळ्या असल्यामुळे एकत्रच त्यांचे संगोपन झाले. एकमेकांची त्या दोघींनी इतकी सवय आहे की, त्यांनी एकाच वराशी विवाह करण्याचे ठरविले. दोघी एकमेकांशिवाय राहू शकत नसल्याने त्या वेगवेगळे विवाह करण्यासही तयार नव्हत्या त्यामुळे त्यांनी अतुल या वराशीच लग्न केले.

अतिशय थाटात हा विवाहसोहळा पार पडला त्याचे व्हीडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा