शाळेतल्या मुलांमधील भांडणात चाकूने हल्ला झाल्याची घटना कांदिवली पश्चिम येथील एका शाळेत घडली आहे. कल्याणमध्ये एका १५ वर्षांच्या मुलाने ९ वर्षांच्या मुलीची गळा चिरून हत्या केल्याची घटना मध्यंतरी घडली होती. त्याप्रमाणेच कांदिवलीत दहावीतील मुलांमध्ये झालेल्या भांडणाचे पर्यावसान या घटनेत झाले.
या विद्यार्थ्यांच्या भांडणाचा व्हीडिओदेखील सोशल मीडिय़ावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी या घटनेनंतर गुन्हा दाखल केला आहे. २६ नोव्हेंबरला ही घटना घडली होती. दोघेही इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. त्यातून एका विद्यार्थ्याने दुसऱ्यावर चाकूने हल्ला केला. यावेळी प्रचंड गोंधळ निर्माण झाला.
हे ही वाचा:
चित्रा वाघ यांच्या मागणीनंतर ते बेकायदेशीर चर्च पाडण्यात आले
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अभियंत्यांना नियुक्तीपत्र प्रदान
अतिसुंदर; गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना पद्मभूषण प्रदान
परवानगीशिवाय फोटो काढत असाल तर होऊ शकते अटक
जखमी झालेल्या विद्यार्थ्याला ट्रायडंट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्या विद्यार्थ्याची प्रकृती आता स्थिर आहे.
सदर व्हायरल व्हीडिओ सध्या विविध माध्यमांवर व्हायरल होत असून त्यात विद्यार्थ्यांची शाळेत गर्दी झाल्याचे दिसते. यादरम्यान एक मुलगा दुचाकीवर बसलेला दिसतो. तेवढ्यात त्याच्या समोरून एक गणवेश घातलेला दुसरा मुलगा येतो आणि तो मोठ्या चाकूने त्याच्यावर वार करतो. दुचाकीवर बसलेला मुलगा तो वार हाताने अडवतो, त्याच्या हातावर त्यामुळे जखम होते. तो दुचाकीवरून कोसळतो आणि हात धरून मागे फिरतो. चाकूने वार करणाऱ्या मुलाला इतर मुले बाजुला करतात आणि तो तिथून निघून जातो. या घटनेमुळे घबराट निर्माण झाली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.