24 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरक्राईमनामाजेवणातून 'आर्सेनिक' आणि 'थेलीयम' देत घेतला नवरा, सासूचा जीव

जेवणातून ‘आर्सेनिक’ आणि ‘थेलीयम’ देत घेतला नवरा, सासूचा जीव

रक्तचाचणीतून लागला शोध

Google News Follow

Related

आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढण्याच्या अनेक घटना परिचयाच्या आहेत. मात्र मुंबईत घडलेली एक घटना मात्र क्रौर्याचे उदाहरणच म्हणावे लागेल. पती आणि सासूला अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने विष देत त्या पत्नीने आपल्या वाटेतील काटे दूर केले.

त्याची कहाणी ही अशी आहे. पोटदुखीच्या आजाराने त्रस्त ४६ वर्षीय व्यावसायिक कमलकांत शहा यांच्यावर इतर खाजगी रुग्णालयामध्ये उपचार केल्यानंतर अखेरीस त्यांना ३ सप्टेंबर रोजी मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बॉम्बे हॉस्पिटलमधील डॉक्टरांना त्याच्या आजाराचे नक्की निदान होत नव्हते, अखेर त्यांनी कमलकांत यांच्या रक्ताच्या काही चाचण्या बाहेरून करण्यास सांगण्यात आले. या रक्ताच्या चाचण्यांचे अहवाल डॉक्टरांच्या हाती आले व आजराचे नेमके निदान समोर आले, कमलकांत यांच्या रक्तात प्रमाणापेक्षा जास्त ‘आर्सेनिक ‘ आणि ‘थेलीयम’ हे विषारी धातू आढळून आले. परंतु वेळ निघून गेली होती, या विषावर कुठलीच मात्रा लागू पडली नाही आणि या विषाने हळूहळू व्यवसायिकाच्या शरीरातील सर्व अवयव निकामी करण्यास सुरुवात केली.

अखेर १९ सप्टेंबर रोजी कमलकांतचे निधन झाले. डॉक्टरानी कमलकांत यांच्या नातेवाईकांना एक महत्वाची गोष्ट लक्षात आणून दिली होती ती म्हणजे आर्सेनिक आणि थेलीयम हे एकप्रकारचे विष असून हे विष कोणीतरी खाण्यापिण्यातून दिल्याशिवाय शरीरात जाणार नाही असे डॉक्टरांनी कमलकांत याच्या रक्ताचा अहवाल बघून सांगितले होते.

कमलकांत शहा (४६) हे पत्नी कविता उर्फ काजल  दोन मुले आणि आई सरलादेवी सोबत सांताक्रूझ पश्चिमेतील गुरुकृपा सोसायटीत राहण्यास होते, कमलकांत यांचा मुंबई, ठाणे आणि भिवंडी येथे पॉवरलूमचा व्यवसाय होता. कमलकांत याना दोन बहिणी असून लग्नानंतर त्या आपल्या सासरी राहत होत्या. कमलकांत याचा बालपणाचा मित्र हितेश जैन याचे शहा याच्या घरी येणे जाणे सुरु असायचे. कमलकांत आणि पत्नी काजल यांच्यात मागील काही महिन्यापासून वाद सुरु होते. या वादातून काजल हि माहेरी निघून गेली होती, कमलकांत यांच्या बहिणी आणि मेव्हुण्यांनी तिची समजूत काढून घरी आणले होते. ती घरात राहत होती, मात्र स्वतःचे आणि मुलीचे जेवण वेगळे करून खात होती. कमलकांत यांनी आई आणि त्यांच्याच्या जेवणासाठी घरगडी ठेवला होता. २९ जुलै रोजी कमलकांत याची आई सरलादेवी हिच्या पोटात अचानक दुखू लागले. तिच्यावर स्थानिक खाजगी रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले, परंतु तिचा आजार दिवसेदिवस वाढत चालला होता, कमलकांतने कोकिळा बेन रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु केले असता तिच्या आतड्याना सूज आल्याचे निदान झाले, त्यानंतर देखील तीची प्रकृती खालावत गेली आणि  हळूहळू तिचे सर्व अवयव निकामी होऊन १३ ऑगस्ट रोजी तिचा मृत्यू झाला. आईच्या मृत्यूनंतर कमलकांत यांच्या दोन्ही बहिणी  काही दिवस भावाकडे राहत होत्या.

डॉक्टरांनी कमलकांत यांच्या नातेवाईकांना एक महत्वाची गोष्ट लक्षात आणून दिली होती ती म्हणजे आर्सेनिक आणि थेलीयम हे एकप्रकारचे विष असून हे विष कोणीतरी खाण्यापिण्यातून दिल्याशिवाय शरीरात जाणार नाही. कमलकांत यांच्या मृत्यू प्रकरणी प्रथम आझाद मैदान पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती व पुढील तपासासाठी हे प्रकरण सांताक्रूझ पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले होते.

हे ही वाचा:

१४ वर्षे गायब असलेल्या महिलेला पोलिसांनी अटक करताना ओळखली ही खूण

प्लास्टिक निर्बंध झाले शिथिल

वागळे मार्गावर रवीशकुमार?

पूर्वपरवानगी न घेता बांधलेली लिफ्ट कोसळली आणि एक जीव गेला

 

भावाचा मृत्यू हा आकस्मात मृत्यू नसून त्यामागे काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय बहिणींनी व्यक्त करून पोलीस ठाण्याला तसा अर्ज दाखल केला होता व भावाच्या संशयास्पद मृत्यूमागे त्याची पत्नी कविता उर्फ काजल हीचा कट असावा असा संशय बहिणींनी अर्जात व्यक्त केला होता. या अर्जाचा तपास २० दिवसापूर्वी  मुंबई पोलिसांच्या गुन्हा शाखा कक्ष ९ कडे सोपविण्यात आला. कक्ष ९ च्या  तपास अधिकऱ्यानी वैद्यकीय अहवाल, डॉक्टरांची चर्चा व कमलकांतच्या नातेवाईकाचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली. यादरम्यान सर्व पुरावे कमलकांतची पत्नी कविता उर्फ काजल आणि हितेश जैन याच्या विरोधात जात होते. गुन्हे शाखेने हितेश जैन याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी सुरु केली तर दुसरीकडे महिला अधिकारी यांनी कविता उर्फ काजल हिच्याकडे चौकशी सुरू केली. दोघांच्या जबाबात अनेक तथ्य आढळून आल्यानंतर तपास यंत्रणानी दोघांची समोरासमोर चौकशी केल्यानंतर दोघांच्या कबुलीत हत्येचा गुन्हा उघडकीस आला. हितेश जैन आणि कविता उर्फ काजल यांचे प्रेमप्रकरण सुरु होते. ही बाब हळूहळू कमलकांत आणि सासू सरलादेवी यांच्या कानावर पडली होती. तेव्हापासून कविता उर्फ काजल हि पती कमलकांत यांच्यासोबत भांडण करून सोडचिठ्ठीसाठी तगादा लावत होती.

त्याचबरोबर कमलकांतची संपत्ती देखील हडप करायची होती यासाठी  दोघांनी  काही महिन्यापूर्वीच कट रचला होता अशी माहिती समोर आली. गुन्हे शाखेने  गुरुवारी या दोघांविरुद्ध हत्या, विष देणे, कट रचणे याप्रकरणी गुन्हा दाखल करून दोघांना शुक्रवारी अटक करण्यात आली आहे.  कमलकांत याची आई सरलादेवी हीच मृत्यू देखील या विषाने  झाला असावा असा संशय पोलिसांना असून या दोघांनी सरलादेवीची याप्रकारे हत्या केल्याचा संशय पोलिसांना असून या अनुषंगाने तपास सुरु आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा