महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रकाश महाजन यांनी उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावरून केलेल्या विधानाची सध्या चर्चा आहे.
प्रकाश महाजन यांनी म्हटले आहे की, उद्धव ठाकरे यांच्या गटात नुकत्याच सामील झालेल्या सुषमा अंधारे यांच्यामुळे पक्षातील महिला नेत्यांची कारकीर्द झाकोळून गेली आहे. त्यामुळे लवकरच उद्धव ठाकरे यांना महिलांच्या बंडालाही सामोरे जावे लागेल.
सुषमा अंधारे यांच्या भाषणावर प्रकाश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली की, आम्ही दोघेही बीड जिल्ह्यातील आहोत. पण त्या काय बोलतात याचे त्यांना भान नाही. त्यांना बोलण्यासाठी ठेवण्यात आले आहे, भुंकण्यासाठी नाही. त्यांच्या मेंदुला नारू झालाय की काय?
हे ही वाचा:
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाइंड गोल्डी ब्रार ताब्यात
महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी सापडल्या सोन्याच्या खाणी
१४ वर्षे गायब असलेल्या महिलेला पोलिसांनी अटक करताना ओळखली ही खूण
मुंबईत विनयभंग झालेल्या कोरियन महिलेने केले भारताचे कौतुक !
अंधारे यांनी उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थान आणि राज ठाकरे यांचे कृष्णकुंज यांची तुलना केली. इतकी वर्षे महापालिकेत सत्ता असूनही मातोश्रीवर मजला चढला नाही पण कृष्णकुंजचा मात्र विकास झाला, असे विधान अंधारे यांनी केले होते. त्यावर प्रकाश महाजन म्हणाले की, मातोश्री २ कशावर उभं राहिलं हे अंधारेंनी पाहिलेलं नाही का? उद्धव ठाकरेंकडे १२६ कोटी कुठून आले, ११ कोटी आदित्य ठाकरेंकडे कुठून आले. उगाच कशाला बोलायला लावताय? नवीन मुसलमान झाला की दिसेल त्याला आदाब आदाब करत सुटल्याप्रमाणे झाले आहे अंधारे यांचे.
काही महिन्यांपूर्वी सेनेत पुरुषांचे बंड झालं आणि राहिलेल्या सेनेत बायकांचं बंड होणार आहे. या बाईंमुळे ज्या उजेडात होत्या त्या बायका अंधारात गेल्या, अशी टीकाही प्रकाश महाजन यांनी केली.