22 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरविशेषमुख्यमंत्र्यांच्या हस्ते अभियंत्यांना नियुक्तीपत्र प्रदान

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अभियंत्यांना नियुक्तीपत्र प्रदान

येत्या वर्षभरात राज्यात ७५ हजार रोजगार उपलब्ध करून देणार

Google News Follow

Related

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे महाराष्ट्राचा महासंकल्प कार्यक्रमानिमित्त जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम आणि मृद व जलसंधारण विभागातील १ हजार ३२ अभियंत्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्याचा राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी राज्य शासनाच्या विविध विभागातील नियुक्तीपत्र मिळालेल्या सर्व अभियंत्यांनी प्रामाणिकपणे लोकहिताची कामे करावीत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त जाहीर केलेल्या योजनेनुसार येत्या वर्षभरात राज्यात ७५ हजार रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

स्पर्धा परीक्षेतील यशस्वी उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान करण्याचा कार्यक्रम राज्यात पहिल्यांदाच होत असल्याचे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, राज्यात गतिमान आणि पारदर्शक पद्धतीने लोकाभिमुख निर्णय घेतले जात आहेत. पायाभूत सुविधा आणि विकास कामांसाठी केंद्र सरकारच्यावतीने मोठा निधी उपलब्ध करून दिला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० लाख उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याची घोषणा करुन एकच वेळी ७१ हजार नियुक्तीपत्रांचे वाटप केले. त्याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ७५ हजार उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याचा महासंकल्प केला आहे.

हेही वाचा :

मुख्यमंत्री शिंदेंनी दिला जत तालुक्याला न्याय

मुंबई मेट्रो-३ ने मिळवले हे नवे यश

स्वच्छता मोहिमेची CPL रंगतेय! ३५० स्वयंसेवक झाले सहभागी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मंत्रिमंडळाच्या प्रत्येक बैठकीत लोकाभिमुख निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यातील १५ मोठ्या प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामुळे राज्यातील हजारो एकर जमीन ओलिताखाली येणार आहे. शेतकऱ्यांसाठी आवश्यक असणारे विविध प्रलंबित विषय मार्गी लावण्यात आले. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन ही रथाची दोन चाके आहेत. राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सकारात्मक इच्छाशक्तीमुळे युवकांना रोजगार देणे शक्य झाले. न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करत १ हजार १४३ पैकी आज १ हजार ३२ अभियंत्यांना नियुक्त्या देण्यात आल्या. उर्वरित १११ उमेदवारांना नियुक्त्या देता आल्या नाहीत. यापुढे त्यांच्यासाठी न्यायालयात भक्कम व आग्रही बाजू मांडून त्यांच्याही नियुक्तीचा मार्ग काढला जाईल, अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा