समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाबरी मशिदी संदर्भात केलेले विधान योग्य नव्हते. महाविकासआघाडी सरकारमधील मुस्लिम नेत्यांनी या वक्तव्याचा निषेध करून राजीनामे द्यायला हवेत.” असे वक्तव्य केले आहे. असे सांगत उद्धव ठाकरेंवर हल्ला केला.
उद्धव ठाकरे यांनी काल (३ मार्च) विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देताना, “बाबरी मस्जिद जर माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्याचा अभिमान आहे.” या बाळासाहेब ठाकरेंच्या वाक्याची आठवण करवून दिली. उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केल्यावर सरकारी पक्षाकडून या वाक्याचं समर्थन करण्यासासाठी बाकही वाजवले नाहीत. अपेक्षेप्रमाणे आता सरकारी पक्षांमधूनच या विरोधातले सूर उमटत आहेत.
हे ही वाचा:
मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत असताना अबू आझमी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. “उद्धव ठाकरे हे आता शिवसेनेचे नेते नाहीत, ते राज्याचे प्रमुख आहेत. त्यांनी असं बोलायला नकॊ होतं. ही खूपच दुख:द घटना आहे. हे सरकार कॉमन मिनिमम प्रोग्रामने चालते. उद्धव ठाकरे यांनी बाबरी मशीद पाडल्याचे समर्थन केले तेव्हा या मुस्लीम नेत्यांना लाज वाटायला पाहिजे होती. बाबरी मशीद पाडणे हे गुन्हेगारी कृत्य असल्याचा निकाल न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे महाविकासआघाडी सरकारमधील मुस्लीम नेत्यांनी एव्हाना राजीनामा द्यायला पाहिजे होता.” असे अबू आझमी यांनी म्हटले.