24 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरक्राईमनामानाशिक आश्रमातील मुलींवरील अत्याचारप्रकरणी चित्रा वाघ यांनी घेतली कठोर भूमिका

नाशिक आश्रमातील मुलींवरील अत्याचारप्रकरणी चित्रा वाघ यांनी घेतली कठोर भूमिका

नराधम हर्षल मोरेने केले घृणास्पद कृत्य

Google News Follow

Related

नाशिकच्या म्हसरूळमधील ज्ञानदीप आश्रमातील विद्यार्थीनींवर हर्षल मोरे या नराधमाने अत्याचार केल्याच्या घटनेने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून यासंदर्भात भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांनी मोहीम हाती घेतली आहे. त्यांनी म्हटले आहे की, संतापजनक घटना आपण पाहिलीत आम्ही शंका बोलून दाखविली की, जो आरोपी आहे हर्षल मोरे त्याने या मुलींवर अत्याचार केल्याची घटना आहे. त्या आश्रमात १३ मुले राहात होत्या. इतर मुलींसोबत नव्हे तर सहा मुलींसोबत त्याने अत्याचार केल्याचे समोर आले आहे. सहा वेगवेगळे गुन्हेही त्याच्यावर दाखल झाले आहेत, अशी माहिती भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांनी दिली.

या गुरुकुल आश्रमातील सहा विद्यार्थीनींवर आश्रमात नाही तर बाहेरही अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. नराधम हर्षल मोरे हा या मुलींना सटाणा, वीरगाव येथे कामानिमित्त नेऊन त्यांच्यावर अत्याचार करत असल्याचे समोर आले आहे. २०१८पासून हे शोषण सुरू असल्याचेही स्पष्ट झाले आहे. राज्यभरात या नराधमाविरुद्ध संतापाची लाट उसळली असून त्याच्याविरुद्धच्या सर्व गुन्ह्यांचा तपास सुरू आहे. १३ पैकी ५ मुलींनी अत्याचाराची माहिती दिली आहे.

चित्रा वाघ म्हणाल्या की, ३७६ आहे, पॉक्सो, अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक अशा कलमांखाली गुन्हे दाखल आहेत. आरोपी सुटणार नाही हे निश्चित काही दिवसांपूर्वी या नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये चार वर्षआंच्या मुलाचा खून झआल्याचेही दिसून आले होते. या गोष्टींमध्ये अनधिकृत आश्रमांचं पेव फुटलेलं आहे. महिला मोर्चा नाशिक युनिट भाजपाने उद्या कलेक्टर चॅरिटी कमिशनर यांची भेट घेऊन या संस्थांची मान्यता रद्द करावी अशी मागणी करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

शिवडीचा किल्ला अतिक्रमणातून मुक्त करणार

आफताबच्या गाडीवर तलवारीने हल्ला; प्रकरण चिघळले

सेंट्रल लायब्ररीच्या निमित्ताने मविआ सरकारने घातला राज्याच्या तिजोरीवरच दरोडा

संजय राऊत यांना आता नवे समन्स

 

केवळ नाशिक नाही राज्यातील सर्वांचं ऑडिट व्हावं जनतेला आवाहन आहे. की तुमच्या आजूबाजूला अशा संशयास्पद हालचाली आढळल्या तर पोलिसांकडे तक्रार करा. पोलिस आपले आहेत, सरकार आपले आहेत, असे आवाहनही चित्रा वाघ यांनी केले आहे.

हा आश्रम द किंग फाऊंडेशनच्या नावे आहे. मोरेची सासू ज्योती शिंदे व एक महिला या मुलींची व्यवस्था पाहते. सदर मोरे हा नराधम यापूर्वी वसतिगृहात मॅनेजर होता. तिथेही त्याची २०१७मध्ये नोकरी गेली. त्यानंतर त्याने स्वतःच आश्रम टाकला. आदिवासींसाठी काम करत असल्याची बतावणी करत त्याने देणग्या वसूल केल्या.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा