26 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरसंपादकीयमहिला आयोग ही राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आहे काय?

महिला आयोग ही राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आहे काय?

रुपाली चाकणकर यांची सोयीस्कर कारवाई

Google News Follow

Related

महाराष्ट्रातील एक तरुणी श्रद्धा वालकर लव्ह जिहादला बळी पडली. दोन वर्षांपूर्वी पोलिसांनी तिच्या तक्रारीची बोळवण केली नसती तर दिल्लीत आफताब नावाच्या श्वापदाकडून झालेली तिची क्रूर हत्या कदाचित टाळली गेली असती. परंतु अशा अनेक संवेदनशील विषयावर मौन बाळगून असलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांना प्रश्न पडतोय, भारत माता विधवा की सधवा ठरवणारे संभाजी भिडे कोण?

आज महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी. पुण्याच्या फुले वाड्यात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात चाकणकर बोलताना त्यांनी हे विधान केले आहे. अशी विधाने केली की मीडियातील चाटुकार त्याचे मथळे बनवायला तयारच असतात. परंतु इथे मिळालेली प्रसिद्धा श्रद्धा वालकरच्या आई-वडिलांना भेटल्यावरही मिळाली असती. मुळात महिला आयोगाचे काम काय? महिलांना न्याय देणे की राजकारणाच्या रोट्या शेकणे? चाकणकरांकडे महिला आयोगाची धुरा आल्यापासून महिला आयोग ही राष्ट्रवादी काँग्रेसची नवी आघाडी झाली आहे की काय असे वाटण्यासारख्या कैक घटना घडल्या आहेत.

श्रद्धा वालकरच्या प्रकरणातील आरोपी अल्पसंख्य समाजातील असल्यामुळे या प्रश्नावर मौन बाळगण्याचे धोरण महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी स्वीकारले आहे. शिउबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सर्वनेते चिडीचूप आहेत. त्यामुळे महिला आयोगानेही तिच भूमिका घेतली आहे. आफताबकडून जीवाला धोका आहे, असे लेखी पत्र देणाऱ्या श्रद्धाची बोळवण करणाऱ्या वसई पोलिसांना महिला आयोगाने जाब विचारला पाहीजे होता. तिच्या दुर्दैवी आई-वडिलांची भेट घेतली पाहिजे होती. अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडणार नाही यासाठी काही उपाययोजना जाहीर केल्या पाहिजे होत्या. परंतु यातले काहीही घडले नाही. श्रद्धा प्रकरण खिजगणतीत नाही, अशा प्रकारे चाकणकर बाईंचे वागणे आहे.

परंतु संभाजी भिडे काय ठरवणार आणि काय ठरवणार नाही या नको त्या उचापती चाकणकर बाईंना कराव्याशा वाटत आहेत. महिला आयोगाच्या माध्यमातून महिलांचे भले होवो न होवो महाविकास आघाडीला आडवे जाणाऱ्यांना अडचणीत कसे टाकता येईल याचा विचार चाकणकर यांनी सतत केला आहे. महीला आयोगाचा वापर महीलांच्या वेदनांवर फुंकर घालण्यासाठी कमी आणि हत्यार म्हणून जास्त झाला आहे.

शिवसेनेचा नेता रघुनाथ कुचिक याच्यावर जेव्हा एका अल्पवयीन तरुणीने बलात्काराचा आरोप केला तेव्हा महिला आयोग मूग गिळून बसला होता. परंतु तिच तरुणी जेव्हा भाजपाच्या महीला नेत्या चित्रा वाघ यांच्याविरोधात आरोप करू लागली तेव्हा आय़ोग अचानक सक्रीय झाला. महाविकास आघाडीचे सरकार असताना महिलांवर झालेल्या अत्याचाराची जंत्री देता येईल, डॉ.स्वप्ना पाटकर यांच्याविरोधात संजय राऊत शिवीगाळ करतायत, असा ऑडीयो व्हायरल झाला, त्यावर कोणतीही प्रतिक्रिया नाही की कारवाई नाही.

धनंजय मुंडे यांच्या द्वितीय पत्नी करुणा मुंडेना कधी जातीवाचक शिव्या दिल्याच्या आरोपावरून तर कधी गाडीत पिस्तुल सापडले म्हणून अटक करण्यात आली. केतकी चितळे हिच्यावर शाई फेक झाली, त्याचवेळी तिच्या विनयभंगाचा प्रयत्न झाला. तुरुंगातून सुटल्यानंतर केतकीने याबाबत उघड आरोप केले होते. आयोगाने याप्रकरणात कोणती भूमिका घेतली हे कुणाला आठवते आहे का? चाकणकर यांच्या दृष्टीने हे महाविकास आघाडीसाठी गैरसोयीचे विषय होते आणि आघाडीची सोय बघणे एवढाच त्यांचा एजेंडा आहे. या सर्वप्रकरणात महिलांना मानसिक वा शारीरीक त्रास देण्याचा प्रयत्न झाला आहे. परंतु चाकणकर बाईंना ही प्रकरणं अदखलपात्र वाटली.

नाशिक म्हसरूळच्या ज्ञानदीप आश्रमात सहा अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. कुंपणाने शेत खाण्याचा हा प्रकार आहे. समाज मनाला रक्तबंबाळ करणारी ही घटना आहे. रिक्षा चालकाकडून कॉलेज आणि शाळकरी तरुणींचा विनयभंग करून त्यांना फरफटत नेण्याच्या घटना घडल्या आहेत. या एखाद्याचे आयुष्य होरपळून टाकतील अशा घटना आहेत. असे काही घडल्यानंतर पीडित व्यक्तिंना भेटून दिलासा दिलाय, पोलिसांकडे पाठपुरावा केला आहे. दोषींविरुद्ध कारवाईसाठी प्रयत्न केले आहेत, यापैकी काहीही करताना महिला आयोग दिसत नाही.

महिला आयोगाचे अधिकार फक्त आणि फक्त राजकीय धुणीभांडी करण्यासाठी वापरले जात असल्याचे दिसते आहे. महिलांना दिलासा देण्यापेक्षा नेत्यांना खूष करणे एवढे काम आता आय़ोगाला उरलेले आहे. महिलांच्या आत्म्याला ठेच पोहोचले अशा कित्येक घटना रोज घडत असताना त्याबाबत उदासीन असलेल्या आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर बाई संभाजी भिडे यांवा सवाल करून आपला करारी आणि निर्भीड बाणा सिद्ध करू पाहातायत. भिडे हे ब्राह्मण असल्यामुळे त्यांच्यावर टीका करणे पक्षीय दृष्टीकोणातून सोयीचे देखील आहे.

हे ही वाचा:

भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी पीटी उषा

बँक दरोडा आणि खुनातील आरोपी अनिल दुबेला अटक

‘सत्तेत असताना काही करायचे नाही सत्ता गेल्यावर प्रश्न विचारायचे, यासाठी वेगळी हिंमत लागते’

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जन्मलेला शेवटचा सिंह मृत्युमुखी

संभाजी भिडे गुरुजींची टिकली तर चाकणकर बाईंच्या लक्षात राहिली, परंतु महिला पत्रकार जीन्स का घालतात, साडी का नेसत नाहीत, हा सुप्रिया सुळे यांचा सवाल मात्र त्यांच्या कानावर गेलेला नसावा. आता मुद्दा हा आहे की आयोगाच्या अध्यक्ष पदावर बसून पक्षाची धोरणे रेटणाऱ्या चाकणकर यांना शिंदे फडणवीस सरकारने पदावर कशाला ठेवले आहे. त्यांना पक्षाचे काम अधिक जोमाने करण्यासाठी त्यांची तात्काळ हकालपट्टी करण्याची इच्छा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना का होत नाही? की इथेही सेटींगचे राजकारण नडते आहे. हा जनतेच्या मनातील प्रश्न आहे आणि जनतेला त्याचे उत्तर हवे आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा