24 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरविशेषआता हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही फिरायला जाऊ शकता!

आता हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही फिरायला जाऊ शकता!

१६० वर्षे जुन्या वास्तूला भेट देण्याची पर्यटकांना मिळणार संधी

Google News Follow

Related

ऑक्टोबरमध्ये देशातील जुन्या व प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये, असे म्हणतात. पायरी सोडाच सामान्य नागरिकांना तेथे सफर करण्याची संधी हेरिटेज वॉकमुळे मिळत आहे. मुंबईतील हायकोर्ट हेरिटेज वॉकच्या पार्श्वभूमीवर वास्तूंचा समृद्ध वारसा, इतिहास याविषयी जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने मुंबईतील हाफकिन इन्स्टिट्यूट येथेही हेरिटेज वॉक सुरू झाला आहे. याची सुरुवात आज, २७ नोव्हेंबरपासून करण्यात आली आहे. आठवड्याच्या प्रत्येक शनिवार व रविवारी तुम्ही हा वॉक करू शकणार आहात. या हेरिटेज वॉकचा कालावधी जास्तीत जास्त एक तासाचा असणार आहे. यासाठी तुम्हाला bookmyshow.com या वेबसाइटवर  जाऊन तिकीट काढावे लागणार आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

जागतिक पर्यटन दिनी हेरिटेज वॉक सुरु करण्यासाठी सामंजस्य करार झाला होता. त्याचीच सुरुवात म्हणून २७ नोव्हेंबर पासून हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये आज, २७ नोव्हेंबरपासून  हा वॉक सुरु करण्यात आला आहे. सकाळी १०, ११ आणि दुपारी १ च्या सुमारास हा वॉक करण्यात आला. या उपक्रमाची माहिती जास्तीत जास्त पर्यटक आणि अभ्यासक घेतील, अशी आशा पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केली.

हेही वाचा :

आसाममध्ये होणार महाराष्ट्र भवन, मुख्यमंत्र्यांची घोषणा

पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या मुलीचा कुचिपुडी डान्स व्हायरल

पंतप्रधान मोदींना धमकी देणाऱ्याला गुजरातमधून अटक

पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ. बी. एन. पाटील म्हणाले, या हेरिटेज वॉकचा एकमेव उद्देश लोकांना विज्ञान आणि कला यांची सांगड असलेल्या वास्तूचे दर्शन घडवणे हा आहे. येथे लोकांना संस्थेच्या वैभवकालीन दिवसाचे दर्शन घडविणरे व्हिटेज फोटो गॅलरी, तसेच बॉम्बे गव्हर्नर यांचे निवासस्थानाच्या इमारतीचे दर्शन घेता येईल. हाफकिन या संस्थेकडे विविध सूक्ष्मजंतूंच्या प्रतिकृतीदेखील आहेत. तसेच प्लेगची लस कशी विकसित झाली याचीही प्रतिकृतीदेखील पर्यटकांना येथे पाहता येणार आहे.

या संस्थेला प्लेगच्या लसीचा शोध लावणाऱ्या डॉ. वाल्डेमार माईकाय हाफकिन यांच्या नावावरून हाफकिन इन्स्टिटयूट असे नाव देण्यात आले आहे. त्याची स्थाना १८९९ मध्ये झाली. प्रशिक्षण, संशोधन आणि चाचणीसाठी हाफकिन संस्था ही भारतातील सर्वात जुन्या बायोमेडिकल संशोधन संस्थांपैकी एक आहे. सांसर्गिक रोगांच्या विविध पैलूंचे प्रशिक्षण, संशोधन आणि चाचणी यामध्ये नेहमी अग्रेसर असलेली एक बहुविद्याशाखीय संस्था म्हणून ही संस्था विकसित झाली आहे. ही संस्था राज्य आणि केंद्रीय सार्वजनिक आरोग्य प्राधिकरणांसोबत काम करते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा