26 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषओशनसॅट-३ आणि आठ नॅनो-उपग्रहांची अवकाश भरारी

ओशनसॅट-३ आणि आठ नॅनो-उपग्रहांची अवकाश भरारी

सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपण

Google News Follow

Related

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो ) शनिवारी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून ओशनसॅट-३ आणि आठ नॅनो-उपग्रहांचे प्रक्षेपण केले. इस्रोकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्रीहरिकोटा स्पेसपोर्टवरून शनिवारी सकाळी ११.४६वाजता प्रक्षेपण झाले. हे उपग्रह पीएसएलव्ही सी – ५४ किंवा इओएस ०६ मिशनचा भाग म्हणून प्रक्षेपित करण्यात आले आहेत.

या मोहिमेचा प्राथमिक पेलोड ओशनसॅट-३ हा ओशनसॅट मालिकेतील तिसऱ्या पिढीचा उपग्रह असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय पिक्सेल इंडियाने विकसित केलेला आनंद नॅनो उपग्रह आणि ध्रुव स्पेस, ऍस्ट्रोकास्ट आणि स्पेस फ्लाईट यूएसएने विकसित केलेले इतर नॅनो उपग्रह देखील प्रक्षेपित करण्यात आले.

२००९ मध्ये ओशनसॅट-२, पृथ्वी-निरीक्षण उपग्रह इओएस अवकाशात पाठवण्यात आला होता. आता राष्ट्रीय अंतराळ संस्था महासागर निरीक्षणांचे निरीक्षण आणि रेकॉर्ड करण्यासाठी तिसरे ओशनसॅट-३ इओएस लाँच करणार आहे. ओशनसॅट मालिकेतील उपग्रह हे पृथ्वीचे निरीक्षण करणारे उपग्रह आहेत, जे केवळ समुद्रविज्ञान आणि वातावरणीय अभ्यासासाठी समर्पित आहेत.

हे ही वाचा:

 परवानगीशिवाय अमिताभ बच्चन यांचा फोटो आणि आवाज वापरता येणार नाही!

श्रद्धा वालकर प्रकरणातील लव्ह जिहाद अंँगलबद्दल काय बोलल्या स्मृति इराणी

आठ तासांची फिल्डिंग आणि चोर आले ताब्यात

विक्रम गोखले यांच्या प्रकृतीला आराम पडतोय!

हा उपग्रह सागरी हवामानाचा अंदाज घेण्यास सक्षम आहे, ज्यामुळे कोणत्याही चक्रीवादळासाठी आधीच सज्ज होता येईल असतो. या उपग्रहाचे एकूण वजन ९६० किलो आहे आणि तो १,३६० वॅट्सवर काम करेल. तसेच ओशनसॅट-3 सूर्य-समकालिक कक्षेत स्थापित केले जाईल. पाच वर्षांचे मिशन लाइफ असण्याचा अंदाज आहे.

इस्रो : आठ नॅनो उपग्रहही प्रक्षेपित करणार
पिक्सेल आणि ध्रुव स्पेस या अनुक्रमे बेंगळुरू आणि हैदराबादयेथील अंतराळ तंत्रज्ञान कंपन्या आहेत. पिक्सेल हा असाच एक स्पेसटेक स्टार्टअप आहे जो आपला तिसरा उपग्रह आनंद प्रक्षेपित करण्यास तयार आहे. आनंद हा हायपरस्पेक्ट्रल सूक्ष्म उपग्रह आहे. याचे वजन १५ किलोपेक्षा कमी आहे, परंतु त्याची तरंगलांबी १५० पेक्षा जास्त आहे, ज्यामुळे ते आजच्या नॉन-हायपरस्पेक्ट्रल उपग्रहांपेक्षा अधिक तपशीलाने पृथ्वीच्या प्रतिमा कॅप्चर करण्यास सक्षम करते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा