23.4 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरक्राईमनामादोन शाळांमध्ये झालेल्या गोळीबारात अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू

दोन शाळांमध्ये झालेल्या गोळीबारात अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू

Google News Follow

Related

दक्षिणपूर्व ब्राझीलमधील दोन शाळांमध्ये झालेल्या गोळीबारात दोन शिक्षक आणि एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून १३ जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना २५ नोव्हेंबरची आहे. सेमी ऑटोमॅटिक पिस्तूल आणि बुलेटप्रूफ व्हेस्ट घातलेल्या शूटरने दोन शाळांवर गोळीबार केला. एका सरकारी आणि एका खाजगी शाळेत गोळीबार झाला. दोन्ही शाळा एस्पिरिटो सॅंटो राज्यातील अराक्रूझ या छोट्याशा शहरात एकाच रस्त्यावर आहेत.

सार्वजनिक सुरक्षेच्या राज्य सचिवालयाने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये, एस्पिरिटो सॅंटोचे सार्वजनिक सुरक्षा सचिव मार्सिओ सेलांटे म्हणाले की, या घटनेच्या छायाचित्रांमध्ये हल्लेखोराने बुलेटप्रूफ वेस्ट घातला होता. सेमी ऑटोमॅटिक पिस्तूल वापरताना दिसले आहे. या गोळीबारात दोन शिक्षक आणि एका विद्यार्थ्यासह तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर नऊ शिक्षकांसह एकूण १३ जण जखमी झाले आहेत.

हल्लेखोर शाळेचे कुलूप तोडून शिक्षकांच्या विश्रामगृहात पोहोचल्याचेही यात दिसून येते. गोळीबार करणाऱ्याचा चेहरा झाकलेला असल्याने त्याची ओळख पटवणे कठीण असल्याचे सेलेंटे म्हणाले. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. यासोबतच या घटनेमागे त्याचा मुख्य हेतू काय होता, यासह अन्य कोणीही यात सहभागी नाही, याचा तपास पोलीस करत आहेत.

हे ही वाचा:

 परवानगीशिवाय अमिताभ बच्चन यांचा फोटो आणि आवाज वापरता येणार नाही!

श्रद्धा वालकर प्रकरणातील लव्ह जिहाद अंँगलबद्दल काय बोलल्या स्मृति इराणी

आठ तासांची फिल्डिंग आणि चोर आले ताब्यात

विक्रम गोखले यांच्या प्रकृतीला आराम पडतोय!

सेलेंट म्हणाले की शूटरला इतरांनी मदत केली होती का, याचा तपास पोलीस करत आहेत. ब्राझीलमध्ये शालेय गोळीबार असामान्य आहे, परंतु अलिकडच्या वर्षांत त्यात वाढ झाली आहे. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, एस्पिरिटो सॅंटोचे गव्हर्नर रेनाटो कॅसग्रांडे म्हणाले की आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि अधिकाऱ्यांना चौकशीसाठी पाठवले आहे. अमेरिकेतील गोळीबारात एक जण जखमी झाला आहे

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा