श्रद्धाच्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. आता आणखी एक बाब समोर येऊ लागली आहे.. तिच्या हत्ये नंतर प्रियकर आफताबने तिचा मोबाईल फोन भाईंदर खाडीत फेकल्याचे पोलिसांना कळले आहे. आफताबचे सिगारेटचे प्रकरण सुध्या उघडीस पाडण्यात आले आहे.
हत्येनंतर श्रद्धाचा फोन हा आफताबकडेच होता. वेळकाळ बघून त्यानी तिचा फोन खाडीत फेकला. तपासादरम्यान ही माहिती आफ्ताबने पोलिसांना दिली. ‘आफताबने श्रद्धाच्या हत्येनंतर तिचा फोन भाईंदर खाडीत टाकला ‘ अशी बातमी दिल्ली पोलिसांना कळताच त्यांनी भाईंदर खाडी येथे फोने शोधण्याचे काम सुरू केले. भाईंदर खाडीत दिल्ली पोलिसांनी तब्बल पाच तास ही मोहीम सुरू ठेवली, पण काही हाथी लागले नाही. ह्या मोहिमेसाठी दोन पाणबुडे कामास लावण्यात आल्या होत्या. ह्या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी हा फोन मिळणे फार महत्त्वाचे आहे. म्हणूनच दिल्ली पोलिसांकडून हा निर्णय घेण्यात आला. त्यांनी दोन पथकं वसईत आणली. शुक्रवारी दुपारी २ ते सायंकाळी ७ वाजे पर्यंत ही मोहीम सुरू होती. ह्या कामात दिल्ली पोलिसांना माणिकपूर पोलिसांनी मदत केली असा दावा माणिकपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील ह्यांनी केला.
नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार आफताब हा श्रद्धाला सिगारेटचे चटके सुद्धा देत होता. आफताबशी सूर जुळल्यानंतर ती स्वतःच्या कुटूंबापासून दूर जात होती, असे तिच्या मित्रांनी गुरुवारी कळवले. श्रध्दाने तिच्या एका जवळच्या मैत्रिणीला सांगितले की आफताब तिला सिगारेटचे चटके देतो. हे धक्कादायक प्रकरण कळताच तिच्या मैत्रिणीने त्वरित आफताबची भेट घेतली. भेट घेऊन तिने आफताबला पोलिसात जाण्याची धमकी सुद्धा दिली. पण श्रद्धाने त्याला एक संधी देण्याचे ठरवले. हे प्रकरण जास्त झाल्यावर श्रद्धाने पोलिसांकडे एक तक्रारही नोंदवली होती पण काही कारणांमुळे पोलिसांचे त्या प्रकरणात दुर्लक्ष झाले.
हे ही वाचा:
परवानगीशिवाय अमिताभ बच्चन यांचा फोटो आणि आवाज वापरता येणार नाही!
श्रद्धा वालकर प्रकरणातील लव्ह जिहाद अंँगलबद्दल काय बोलल्या स्मृति इराणी
आठ तासांची फिल्डिंग आणि चोर आले ताब्यात
विक्रम गोखले यांच्या प्रकृतीला आराम पडतोय!
श्रद्धा वालकर हिच्या हत्येच्या प्रकरणात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ह्यांनी ग्वाही दिली आहे. “झालेल्या घटनेशी संबंधित सगळी माहिती आणि पुरावे लवकरात लवकर शोधण्यात येतील. ज्यांनी हे कर्म केले आहे त्याला कठोर शिक्षा दिली जाईल. ह्या सर्वाची काळजी दिल्ली पोलीस आणि सरकारी वकील घेतील. ज्यावेळी तिने तक्रार केली तेव्हा आमची सरकार नव्हती परंतु आता ह्या प्रकरणात संपूर्णपणे लक्ष घालण्यात येईल “, अमित शहा म्हणाले.