27 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणमुख्यमंत्री पुन्हा जाणार कामाख्या देवीच्या दर्शनाला

मुख्यमंत्री पुन्हा जाणार कामाख्या देवीच्या दर्शनाला

एक विशेष विमान २०० सदस्यीय शिष्टमंडळ घेऊन मुंबईहून गुवाहाटीला जाणार

Google News Follow

Related

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या मंत्री आणि पक्षाच्या आमदारांसह शनिवारी गुवाहाटी येथे कामाख्या देवीची पूजा करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी जाणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एक विशेष विमान २०० सदस्यीय शिष्टमंडळ घेऊन मुंबईहून गुवाहाटीला जाणार आहे.

शिवसेनेमध्ये बंड केल्यानंतर सहा महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे आपल्याबरोबर ४० आमदारांना घेऊन आधी सूरत आणि नंतर गुवाहटीला गेले होते. बंड यशस्वी होत असल्याचे लक्षात येताच शिंदे यांनी त्यावेळी कामाख्या देवीचं दर्शन घेतलं होतं. त्यावेळी शिंदे यांनी देवीला नवस केला होता. हा नवस फेडण्यासाठी शिंदे २६ आणि २७ नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा कामाख्या देवीच्या दर्शनासाठी जात आहेत, असे सूत्रांनी म्हटले आहे. बंडाच्या वेळी एकनाथ शिंदे सर्व आमदारांसह मागीलवेळी ज्या हॉटेल रेडिसन ब्लू मध्ये उतरले होते त्याच हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम असणार आहे .

महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर या भेटीकडे आभार दौरा म्हणून पाहिले जात आहे. २६ तारखेलाच गुवाहटीत कामाख्या देवीच्या मंदिरात विशेष पूजा आयोजित करण्यात आली आहे. या दौऱ्यासाठी सरकारी कारणही देण्यात आले आहे. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांच्याबरोबर बैठक घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र आणि आसाम या दोन राज्यांमध्ये पर्यटनासंबंधी काही सामंजस्य करार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा:

 परवानगीशिवाय अमिताभ बच्चन यांचा फोटो आणि आवाज वापरता येणार नाही!

श्रद्धा वालकर प्रकरणातील लव्ह जिहाद अंँगलबद्दल काय बोलल्या स्मृति इराणी

आठ तासांची फिल्डिंग आणि चोर आले ताब्यात

विक्रम गोखले यांच्या प्रकृतीला आराम पडतोय!

एकनाथ शिंदे आमदारांसह गुवाहाटीत असताना त्यांनी एकट्याने कामाख्या देवीचे दर्शन घेतले. लवकरच आपण पुन्हा सर्व आमदारांसह भेटीला येणार असल्याचेही शिंदे यांनी त्यावेळी सांगितले होते.या भेटीनंतर मंत्रीमंडळ विस्ताराची एकनाथ शिंदे घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे या मंत्रिमंडळ विस्तारात नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचेही सूत्रांकडून समजते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा