26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामापंतप्रधान मोदींना जिवे मारण्याची धमकी

पंतप्रधान मोदींना जिवे मारण्याची धमकी

पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याच्या धमकीच्या या संदेशानंतर सर्वच यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

Google News Follow

Related

मुंबई वाहतूक पोलिसांना पंतप्रधान नरेंद्र मोदींना जिवे मारण्याच्या धमकीचा मेसेज आला आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या हस्तकांकडून पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट रचण्यात येत असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली आहे. वाहतूक पोलिसांच्या नंबरवर हे सांगणारा ऑडिओ मेसेज आलेला आहे. त्यानंतर आता पोलीस सतर्क झाले असून, पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

दाऊदचे दोन हस्तक मोदींना मारणार अशा प्रकारचा मेसेज वाहतूक पोलिसांना आला आहे. ऑडिओ क्लीपमध्ये दोन हस्तकांची नावं सुद्धा घेण्यात आली आहेत. मुंबई विभागाच्या व्हाट्सअपवर हे मेसेज आले आहेत. हे मेसेज प्राप्त होताच गुन्हे शाखेने तपास सुरु केला आहे. या मेसेजमध्ये काही फोटो सुद्धा आले असून, हे फोटो मुंबईतील काही ठिकाणचे आहेत, अशी पोलिसांना माहिती आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांचे एक पथक त्या ठिकाणी रवाना झाले आहे. ऑडिओ मेसेजमध्ये मुस्तका अहमद आणि नवाज नावाचे दोन हस्तक पंतप्रधानांना मारणार असल्याचा उल्लेख केला आहे.

हे ही वाचा : 

श्रद्धा हत्या प्रकरण उघडकीस आल्यापासून आफताबचे कुटुंब गायब

‘पुन्हा सत्तेत येण्यासाठी पदयात्रा काढत आहेत’

हिजाबविरोधाच्या समर्थनार्थ इराण फुटबॉल संघाने टाळले राष्ट्रगीत

कतारमधील फुटबॉल वर्ल्डकपमध्ये वादग्रस्त झाकीर नाईक करणार इस्लामचा प्रचार

मुंबई वाहतूक विभागाला सलग दोन दिवस असा धमकीवजा ऑडिओ मेसेज आला होता. एका ऑडिओ क्लिपमध्ये दाऊदच्या दोन हस्तकांची नावं घेतली आहे. हे दोघेजण पंतप्रधान मोदींना मारण्याचा प्रयत्न करत आहेत, असं म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याच्या धमकीच्या या संदेशानंतर सर्वच यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. त्यांनी तात्काळ मुंबई पोलीस, गुन्हे शाखा यांना याबाबतची माहिती दिली आहे. त्यानंतर पोलीस पथकांनी एका हिरे कंपनीच्या व्यवस्थापकाची चौकशी केली असता समुप्रभात बेज नावाचा व्यक्ती काही दिवसांपूर्वी त्यांच्याकडे काम करत होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा