24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारण'पुन्हा सत्तेत येण्यासाठी पदयात्रा काढत आहेत'

‘पुन्हा सत्तेत येण्यासाठी पदयात्रा काढत आहेत’

पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींच्या पदयात्रेवर भाष्य केले.

Google News Follow

Related

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरु आहे. यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेसुद्धा गुजरात दौऱ्यावर गेले आहेत. यादरम्यान, पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि त्यांच्या भारत जोडो यात्रेचा खरपूस समाचार घेतला. निवडणुकीच्या काळात विकासावर बोलण्याऐवजी काँग्रेस माझ्यावर टीका करत आहे, अशी टीका मोदींनी कॉंग्रेसवर केली आहे.

गुजरातमधील सुरेंद्रनगर शहरात एका निवडणूक प्रचारसभेत पंतप्रधान मोदी बोलत होते. ते म्हणाले, जे सत्तेबाहेर फेकले गेले आहेत, ते पुन्हा सत्तेत येण्यासाठी पदयात्रा काढत आहेत. गुजरातमध्ये देशाच्या ८० टक्के मीठ उत्पादित होते. परंतु गुजरातचे मीठ खाऊनही काही जण गुजरातला शिव्याशाप देऊन अपमान करतात. ज्यांना काही वर्षांपूर्वी पदच्युत केले गेले, ते पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी यात्रा काढत आहेत. त्यांनी खुशाल पदयात्रा काढावी.

नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर नुकत्याच महाराष्ट्रात राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेत सामील झाल्याचा संदर्भ घेऊन मोदींनी वक्तव्य केले. ते म्हणाले, ज्यांनी ४० वर्षे गुजरातमधील नर्मदा धरण प्रकल्प रखडवला, त्यांना ते या पदयात्रेत सहभागी करून घेत आहेत. नर्मदा धरण प्रकल्प ४० वर्षे रखडवणाऱ्यांना शिक्षा देण्याचा निर्णय गुजरातच्या जनतेने घेतला आहे. त्यामुळे त्यांना पदयात्रा काढायची असेल तर त्यांनी ती खुशाल काढावी.

हे ही वाचा : 

हिजाबविरोधाच्या समर्थनार्थ इराण फुटबॉल संघाने टाळले राष्ट्रगीत

कतारमधील फुटबॉल वर्ल्डकपमध्ये वादग्रस्त झाकीर नाईक करणार इस्लामचा प्रचार

त्याच्यासाठी तरी राहुल गांधी ‘पंतप्रधान’ होतील?

पनवेलमध्ये दुहेरी हत्याकांडाने खळबळ

पूर्वी काँग्रेस माझ्यासाठी अपशब्द वापरत होते. नीच आदमी, मौत का सौदागर, नाली का कीडा असे अपशब्द वापरात काँग्रेस मला संबोधत होते. मात्र मला कोणताही दर्जा नाही. मी जनतेचा सेवक असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत. दरम्यान, येत्या १ आणि ५ डिसेंबरला गुजरातमध्ये दोन टप्प्यांत मतदान पार पडणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा