मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना एसआरएने दणका दिला आहे. किशोरी पेडणेकर यांच्या वरळीतील चार सदनिका ताब्यात घेण्याचे आदेश एसआरएने मुंबई महापालिकेला दिले आहेत. भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर एसआरएने हे आदेश दिले आहेत.
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पेडणेकर यांच्या चार सदनिकांविषयी एसआरएमध्ये तक्रार केली होती. पेडणेकर यांनी या सदनिका बळकावल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या बेनामी सदनिकांवर कारवाई करा, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली होती. त्यानंतर एसआरएने महापालिकेला हे आदेश दिले आहेत. मुंबई महापालिकेने या बेनामी सदनिका चार दिवसात ताब्यात घ्याव्यात असे आदेश दिल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.
एसआरए घोटाळा जूनमध्ये नोंदवण्यात आला होता. सुरुवातीला या एफआयआरमध्ये किशोरी पेडणेकर यांचे नाव नव्हते. याप्रकरणी चौकशीनंतर चार लोकांना अटक करण्यात आली होती. अटक झालेल्या चौघांपैकी एक संशयित किशोरी पेडणेकर यांच्या जवळचा आहे. तसेच एक संशयित महापालिकेचा कर्मचारीही असून आपल्या जबाबात माजी महापौरांचे त्याने नाव घेतले आहे.
हे ही वाचा :
अर्थसंकल्पाची तयारी सुरू झाली!
स्कुल व्हॅन चालकाने विद्यार्थ्यांनीवर अतिप्रसंग करण्याचा केला प्रयत्न
श्रद्धा वालकर, लव्ह जिहाद आणि हिंदू-मुस्लिम विवाह
धक्कादायक! समाजसेविकेनेच पाच दिवसांचे बाळ विकले
एसआरए घोटाळाप्रकरणी एकूण नऊ लोकांनी तक्रार केली होती. एसआरएमध्ये फ्लॅट देण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून पैसे घेण्यात आले होते, मात्र त्यांना फ्लॅट मिळालेच नाहीत. या प्रकरणात ज्या दोन लोकांनी पेडणेकर यांचा नाव घेतले. त्यानंतर दादर पोलिसांनी पेडणेकर यांची दोन वेळा चौकशी केली होती. आता एसआरएच्या आदेशानुसार चार सदनिका मुंबई महापालिका ताब्यात घेणार आहे.