जगातील सर्वात मोठी ई-व्यापार क्षेत्रातील ऍमेझॉन कंपनीने काही दिवसांपूर्वी शेकडो कर्मचाऱ्यांच्या नोकरी कपातीचे आदेश जाहीर केले आहेत. तसेच भारतातील ऍमेझॉन कंपनीतील कर्मचाऱ्यांना आपली नोकरी गमवावी लागू शकते. तसेच यापूर्वी सर्वच बड्या क्षेत्रातील कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. त्यामध्ये युनिकॉर्न्स बायजूस, Chargebee, Cars24, LEAD, Ola, Meesho, MPL, Innovaccer, Udaan, Unacademy आणि Vedantu यासह ४४ स्टार्टअप्सद्वारे आतापर्यंत १५,७०८ कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे आहेत. मात्र ऍमेझॉनकडून भारतात सर्वात जास्त कर्मचाऱ्यांचे सर्वात मोठी कपात असेल असे सांगितले जात आहे.
मागील काही महिन्यांपासून जागतिक स्तरावर तंत्रज्ञान कंपणीमधील नवी व्यवसाय बांधणी व काटकसर म्हणून अनेक कंपन्यांकडून कर्मचारी वर्गाची कपात केली जात आहे. यामध्ये ऍमेझॉन कंपनीने भारतात अंदाजे १० हजार कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात येण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच ऍमेझॉन कंपनी ही जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स, वेब सेवा आणि व्हिडिओ व म्युजिक स्ट्रीमिंग सेवेसह अनेक व्यवसायात सक्रीय आहे. अशातच ऍमेझॉन कंपनीचे भारतात अंदाजे १ लाखांच्या घरात कर्मचारी असण्याची शक्यता आहे.
सावरकरांसाठी ठाकरे गट सत्ता सोडू शकत नाही
निवडणूक अधिकाऱ्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकली आणि बसला दणका
दहशतवादाच्या आर्थिक मदतीच्या मुळावरच घाव घालणार
आफताबने केलेल्या मारहाणीमुळे श्रद्धा दोन वर्षांपूर्वी ‘ऍडमिट’ होती
जागतिक स्तरावर मोठ्या कंपनीमध्ये कर्मचारी कपातीचे सत्र चालू आहे. त्यामध्ये मेटा कंपनीचे सर्वेसव्हा मार्क झूकेरबर्ग यांनी कपातीच्या या सत्रामद्धे सुमारे ११ हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिले असून, ट्विटरचे नवे मालक एलोण मस्क यांनी कंपनीमधून कर्मचाऱ्यांची सुद्धा कपात केले आहे. यापूर्वी ‘न्यू यार्क टाइम्स’ने प्रथम ऍमेझॉन कंपनी बद्दलच नोकरी कपातीबाबत वृत्त दिले होते. अशातच फेसबूक, व्हाट्सअप, इनस्टाग्राम या समाज माध्यमांच्या व्यासपीठांवर आता भारताच्या संध्या देवनाथन यांची गुरवारी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच २०१६ मध्ये संध्या या मेटामध्ये सामील झाल्या होत्या. तसेच नववर्षात १ जानेवारी २०२३ या पदावर रुजू होणार आहेत.