30 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरराजकारणफारुख अब्दुल्ला यांचा नॅशनल कॉन्फरन्सच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

फारुख अब्दुल्ला यांचा नॅशनल कॉन्फरन्सच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

जबाबदारी नव्या पिढीकडे सोपवण्याची वेळ आली आहे

Google News Follow

Related

जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी १८ नोव्हेंबर रोजी नॅशनल कॉन्फरन्सच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ही जबाबदारी नव्या पिढीकडे सोपवण्याची वेळ आली आहे असे अब्दुल्ला म्हणाले आहेत.

८५ वर्षीय अब्दुल्ला पक्षाच्या संरक्षकाची भूमिका स्वीकारतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. पक्षाचे विद्यमान उपाध्यक्ष आणि त्यांचा मुलगा ओमर अब्दुल्ला हे पक्षाचे अध्यक्ष होण्याची शक्यता आहे. प्रकृतीच्या कारणामुळे त्यांनी हा राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे. श्रीनगरमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते म्हणाले की, त्यांची तब्येत साथ देत नाही, म्हणून मी आपल्या पदाचा राजीनामा देत आहे.

पक्षाचे प्रवक्ते तन्वीर सादी यांनी फारुख अब्दुल्ला यांच्या राजीनाम्याची माहिती दिली आहे. आता लवकरच नव्या अध्यक्षाची निवड होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. नवे अध्यक्ष निवडून येईपर्यंत फारुख अब्दुल्ला अध्यक्षपदी राहतील असे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा : 

कर्नाटक सरकारचा ‘गो रक्षणा’साठी मोठा निर्णय

मनसे उधळणार राहुल गांधींची शेगावमधील सभा

भारतात येणाऱ्या पर्यटकांमध्ये वाढ

आदित्य ठाकरेंच्या ड्रीम प्रकल्पांना स्थगिती

नॅशनल कॉन्फरन्सच्या अध्यक्षपदाची निवडणूक आता ५ डिसेंबरला होणार आहे. डॉ. फारुख अब्दुल्ला म्हणाले की, नॅशनल कॉन्फरन्सचा कोणताही नेता अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवू शकतो. ते म्हणाले की, आमचा पक्ष लोकशाहीवर विश्वास ठेवतो. डॉ. फारूख अब्दुल्ला यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर एनसी नेते तन्वीर सादिक यांनी ट्विट करत डॉ. अब्दुल्ला पक्षाचे अध्यक्षपदी कायम राहतील असे म्हटले आहे . पक्षाचे प्रवक्ते इम्रान दार म्हणतात की ते आपल्या निर्णयावर ठाम आहेत. त्याच्या या निर्णयाचे सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. पक्षाध्यक्षपदासाठी ५ डिसेंबरला निवडणूक होणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
197,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा