राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानानंतर राज्यभरात वातावरण तापले आहे. विविध ठिकाणी निदर्शेने करून या वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे. शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधी यांनी सावरकरांचा मुद्दा आणण्याची गरज नव्हती. सावरकरांच्या मुद्यावरून मविआमध्ये फूट पडू शकते, असे सूचक विधान केले आहे. त्यांच्या या विधानाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सावरकरांसाठी ठाकरे गट सत्ता सोडू शकत नाही, अशी जोरदार टीका फडणवीस यांनी केली आहे.
दरवेळी राहुल गांधी महाराष्ट्रात येऊन वाटेल तसं बोलतात. शिवसेनेचे नेते हे ते गेल्यावर काहीतरी एखादं वाक्य बोलतात. बाकी सत्तेकरिता त्यांच्यासोबत आहे. हे सावरकरांकरिता सत्ता कधीच सोडू शकत नाही असे फडणवीस म्हणाले आहेत. राऊत बोलतात पण सत्तेसाठी ते राहुल गांधी यांच्यासोबतच असा टोलाही फडणवीस यांनी लगावला आहे.
हे ही वाचा :
कर्नाटक सरकारचा ‘गो रक्षणा’साठी मोठा निर्णय
मनसे उधळणार राहुल गांधींची शेगावमधील सभा
भारतात येणाऱ्या पर्यटकांमध्ये वाढ
आदित्य ठाकरेंच्या ड्रीम प्रकल्पांना स्थगिती
राहुल गांधी यांनी कायद्याच्या चौकटीत रहावे
राहुल गांधी यांची यात्रा सुरू आहे. आम्ही सुरक्षा दिली आहे. सुरक्षितपणे आम्ही त्यांची यात्रा बाहेर काढू. पण, महाराष्ट्राचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये. कायद्याच्या चौकटीत राहून काही केलं तर ठिक आहे. पण, कायद्याच्या चौकटीबाहेर काही केलं तर त्याच्यावर आम्हाला कारवाई करावी लागेल असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे. फडणवीस म्हणाले, मला असं वाटतं, मीडियाचं लक्ष वेधून घेण्यासाठी अशी विधानं केली जात असावीत. राहुल गांधी यांच्यासारख्या व्यक्तींवर कारवाई करून काही फायदा नसतो. अनेक केसेस यापूर्वीदेखील ते भोगत आहेत. ते तसेही बेलवरच आहेत. अनेक वेळा कोर्टात हजर राहत नाही. म्हणून वारंट निघतात. ते खोटं बोलताहेत. त्याचं उत्तर मात्र आम्ही निश्चितपणे देऊ असा इशाराही फडणवीस यांनी दिला.