27 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरविशेषकर्नाटक सरकारचा 'गो रक्षणा'साठी मोठा निर्णय

कर्नाटक सरकारचा ‘गो रक्षणा’साठी मोठा निर्णय

सरकारी कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार कापला जाणार आहे.

Google News Follow

Related

कर्नाटक सरकारने गो रक्षणासाठी एक मोठा निर्णय घेत नवी योजना आणली आहे. या योजनेत सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार कापला जाणार आहे. ते पैसे गाईंच्या रक्षणासाठी वापरला जाणार आहेत.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वातील सरकारने एक आदेश काढला आहे. ‘पुण्यकोटी दत्तु योजना’ या नावाने ही मोहीम राबवली जाणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनामधून एकवेळा ही रक्कम कपात केली जाणार आहे. या वेतन कपातीमधून कर्नाटक सरकार ८० ते १०० कोटी रुपये निधी उभा करणार आहे. या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना गो-पालनासाठी प्रवृत्त करण्यात येत आहे.

ज्या सरकारी कर्मचाऱ्यांना ही कपात नको असेल, त्यांना यासंदर्भातील कारण द्यावं लागणार आहे. आपल्या विभागप्रमुखांना यासंदर्भात अर्ज करावा लागणार आहे. २५ नोव्हेंबरपूर्वी याबाबत विभागप्रमुखांना लेखी कळवावं लागणार आहे. शिपाई, स्वच्छता कर्मचारी आणि डी ग्रेड कर्मचाऱ्यांना यातून मुभा मिळणार आहे.

हे ही वाचा : 

आदित्य ठाकरेंच्या ड्रीम प्रकल्पांना स्थगिती

मनसे उधळणार राहुल गांधींची शेगावमधील सभा

भारतात येणाऱ्या पर्यटकांमध्ये वाढ

महाराष्ट्रातील भाविकांसाठी अयोध्येत भक्त निवास ?

कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात झालेला निधी पशुसंवर्धन विभागाकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याची माहिती सरकारने दिली आहे. यापूर्वी कर्नाटकमध्ये या योजनेमध्ये ऐच्छिक दान करण्याचा पर्याय होता. मात्र आता कर्मचाऱ्यांच्या पगारातून पैसे कपात होणार आहेत. भाजपशासित राज्यांमध्ये गो संरक्षणासाठी ही योजना सुरु केली जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
196,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा