31 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरराजकारणराहुल गांधी याचं वक्तव्य हा बेअक्कलपणा

राहुल गांधी याचं वक्तव्य हा बेअक्कलपणा

over-

Google News Follow

Related

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यातील भाजप नेते आक्रमक होऊन टीका करत आहेत. भाजप नेते आशिष शेलार यांनी राहुल गांधींच्या वादग्रस्त विधानावरुन राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली आहे. राहुल गांधी याचं सावरकर यांच्या बद्दलचं वक्तव्य हा बेअक्कलपणा असल्याची टीका शेलार यांनी केली आहे. राहुल गांधी यांनी दुसऱ्याला चॅलेंज करण्याच्या आधी स्वत:च्या आजीचं पात्र वाचावं असा सल्ला देतानाच शेलार यांनी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं सावरकरांना पाठवलेलं एक पत्र पत्रकार परिषदेत सादर केलं . उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली वाहीली, अशी सणकून टीकाही शेलार यांनी यावेळी केली.

“राहुल गांधी यांनी पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी यांचा अभ्यास केला नाही. आता केवळ केरळमधून निवडून आल्यानंतर हिरवा झेंडा आणि हिरव्या झेंड्याची मतं एवढ्यापुरताच त्यांनी अभ्यास केलेला दिसतोय. म्हणून त्यांचं विधान हे बेअक्कलपणाचं आहे. आम्ही त्यांचा निषेध करतो”, असे टीकास्त्र शेलार यांनी सोडले.

इंदिरा गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावकर यांना पाठवलेलं एक पत्र पत्रकार शेलार यांनी परिषदेत दाखवलं. शेलार म्हणाले, या पत्रात इंदिरा गांधी यांनी वीर सावरकर असा उल्लेख केलाय. राहुल गांधी वीर या शब्दावरुन आपल्या भाषणात ताशेरे ओढण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या आजीचं पत्रसुद्धा त्यांनी वाचलेलं नाही”, असं आशिष शेलार म्हणाले. राहुल गांधी यांनी दुसऱ्याला चॅलेंज करण्याच्या आधी स्वत:च्या आजीचं पात्र वाचावं अस सल्ला शेलार यांनी यावेळी दिला. “इंदिरा गांधी या सावरकरांचं युद्ध हे अतिशय धाडसी होतं असं म्हणतात. ब्रिटश सरकारच्या विरोधातील त्यांच्या कामांची नोंद इतिहासात होईल, असं कार्य सावरकरांनी केल्याचं त्यांनी पत्रात म्हटलंय” असा उल्लेख शेलार यांनी पत्र वाचून दाखवताना केला.

हे ही वाचा:

रणजित सावरकर राहुल गांधींविरोधात तक्रार करणार

गॅस सिलिंडर चोरीविरोधात सरकारचा आता ‘कोड’वर्ड

‘राहुल गांधी हा मनोरुग्ण, सावरकर समजण्याइतकी अक्कल या माणसामध्ये नाही’

धारावीत बाळासाहेब ठाकरे दवाखाना

ठाकरे यांनी बोटचेपी भूमिका का घेतली
“खरं म्हणजे हिंदुस्तानची ज्यांच्याकडून अपेक्षा होती ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धवजींनी तरी बोटचेपीची भूमिका घेऊ नये, अशी आशा होती. पण उद्धवजींनी सत्तेसाठी माती खाल्ली आणि बोटचेपीची भूमिका घेतली” असा कडाऊन आरोप शेलार यांनी केला. ठाकरे याना बाळासाहेबांच्या विचारांचा विसर पडलेला आहे. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली वाहिली आहे. जे स्वतःच्या वडिलांचे विचार विसरले ते इतिहासही विसरले अशी खोचक टीका शेलार यांनी केली.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
197,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा