मुंबईच्या छत्रपति शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या पथकाने शुक्रवारी दोन कारवाई केल्या आहेत. या दोन कारवाईमध्ये आता पर्यंत ६१ किलो सोने जप्त करण्यात आले आहेत. तसेच या जप्त करण्यात आलेल्या या सोन्याची किंमत ही ३२ कोटी रुपये असल्याची माहिती हि सीमा शुल्क विभागीय अधिकाऱ्यानी सांगितले. तसेच आता पर्यंत केलेल्या या कारवाई मध्ये ही सर्वात मोठी कारवाई आहे. या घटनेमध्ये सात जणांना अटक करण्यात आले असून, त्यामध्ये वृद्ध महिलेचा सुद्धा समावेश आहे.
सीमा शुल्क विभागाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या पहिल्या कारवाईमध्ये प्रथम टांझानियाहून आलेला चार भारतीय प्रवाशांची झडती घेतली असता. त्यांच्या कमरेच्या पट्ट्यामध्ये सोन्याची लगड लपवण्यात आली होती. प्रत्येक लगडमध्ये १ किलो सोने लपवल्याचे कारवाईमध्ये उघड झाले आहेत. तसेच या चार जणांकडून ५३ किलो सोने जप्त करण्यात आले आहे. त्याची बाजारातील एकूण किंमत २८ कोटी १७ लाख रुपये असल्याचे एका अधिकऱ्यानी संगीतले. हे चारही आरोपी दोहा येथून कतार एयरवेजने मुंबई आंतराराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले होते. त्यांना अटक करण्यात आले असून, न्यायालयापुढे हजार करण्यात आले. न्यायालयाने पुढे या चारही आरोपीना न्यायालयीन कोठडी सुनावल्याचे अधिकाऱ्यानी सांगितले.
हे ही वाचा:
आव्हाडांच्या कार्यकर्त्यांचा धुडगूस; सर्वसामान्यांचे हाल
आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा, आव्हाड देणार आमदारकीचा राजीनामा
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांचे ‘अशुद्ध’ ट्विट व्हायरल
टिपू सुलतानाचा पुतळा बसवला तर बाबरी ढाचा सारखी अवस्था करू
तर दुसऱ्या कारवाईमध्ये सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यानी विस्तारा विमानाने दुबईहुन आलेलया तीन प्रवाशांची झडती घेतली असता आठ किलो सोने जप्त करण्यात आले आहे. त्यामध्ये एक पुरुष व दोन महिला यांचा या घटनेमध्ये समावेश आहे. तसेच या जप्त करण्यात आलेल्या आठ किलो सोन्याची किंमत ही ३ कोटी ८८ लाख रुपये असल्याची माहिती एका अधिकऱ्यानी दिली. तसेच या आरोपींकडे मेणाच्या स्वरूपात सोन्याची भुकटी सापडली होती. या संदर्भात तीन आरोपीना अटक करण्यात आले असून त्यामध्ये एक वृद्ध महिलेचा सुद्धा समावेश आहे. तसेच या सातही आरोपीना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्यांना अटक करण्यात आली आहे.