राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्याने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. मुंब्रा पोलीस ठाण्यात आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. मध्यरात्री आंदोलक पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडून बसले होते. सकाळी आंदोलकांनी जाळपोळ केली. तसेच मुंब्रा पोलीस ठाण्याबाहेरील रस्ता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अडवून धरला आहे. आंदोलक वाहतूक बंद करण्याचा प्रयत्न करत असून, याचा त्रास सर्वसामान्यांना होतं आहे.
मुंब्रा पोलीस ठाण्याबाहेर आंदोलक रास्ता रोको आंदोलन करत आहेत. रस्त्याच्यामध्ये रिक्षा आडव्या उभ्या करून आंदोलकांनी वाहतूक थांबवली आहे. यामुळे या रस्त्यावर ट्राफिक जाम झाले असून, यामध्ये शाळेची बससुद्धा अडकली आहे. राष्ट्रवादीच्या आंदोलनामुळे सर्वसामान्यांचे हाल होतं आहेत. विवियाना मॉलच्या मागे असलेल्या आव्हाडांच्या निवासस्थानाबाहेर सुद्धा कार्यकर्ते जमले आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुंब्रा बंद पाडण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. मुंब्रा बायपासच्या इथे आंदोलकांनी टायर जाळले आहेत.
हर हर महादेव चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षणकांना चित्रपटगृहातून बाहेर काढत मारहाण केल्याप्रकरणी आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्याविरोधात ठाणे वर्तक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी सुद्धा आव्हाडांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केले होते.
हे ही वाचा:
आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा, आव्हाड देणार आमदारकीचा राजीनामा
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांचे ‘अशुद्ध’ ट्विट व्हायरल
टिपू सुलतानाचा पुतळा बसवला तर बाबरी ढाचा सारखी अवस्था करू
दोन विमाने हवेतच एकमेकांवर आदळली आणि उसळला आगीचा डोंब
कळवा आणि ठाणे शहाराला जोडणाऱ्या तिसऱ्या कळवा खाडी पुलाचे उद्धाटन काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. या उद्धाटन कार्यक्रमावेळी आव्हाड यांनी धक्का दिल्याचा आरोप भाजपा महिला पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. याबाबत महिलेने आव्हाडांविरोधात मुंब्रा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.