ठाणे पोलिसांनी आठ कोटी रूपयांच्या २ हजाराच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली असून आरोपींनी पालघर येथील औद्योगिक युनिटमध्ये चलनी नोटा छापल्या होत्या. तसेच या रॅकेटचा मुख्य सूत्रधार चौहान हा फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे. ठाणे गुन्हे शाखा यु ५ चे प्रभारी विकास घोडके यांना ११ नोव्हेंबरच्या सकाळी बनावट नोटा घेऊन येणारे दोन व्यक्ती घोडबंदर रोडला येणार असल्याची खास सूत्रांकडून माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी नियोजन करून या आरोपिंना पकडले.
पोलिसांनी सकाळी १०:४० च्या सुमारास गायमुख चौपाटी येथे सापळा रचला. पोलिसांना संशयास्पद कार (एमएच-०४-डीबी-५४११) दिसली. त्यांनी ही गाडी थांबवली. कारची झडती घेतली असता, पोलिसांना २००० च्या बनावट नोटांचे ४०० बंडल सापडले ज्याचे एकूण मूल्य आठ कोटी रुपये इतके आहे. राम हरी शर्मा (५२) आणि राजेंद्र घरत (५८) अशी या दोन्ही आरोपींची नावे आहेत. चोकशीमध्ये आरोपींनी मदन चौहानच्या मदतीने नोटा छापल्या होत्या तसेच आरोपींनी ठाण्यात नोटा विकण्यासाठी आणल्याचे सांगितले, या गुन्ह्यातील मुख्य आरोपी मदन चौहान हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी विकास घोडके यांनी दिली.
हे ही वाचा :
सुषमा अंधारेंचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे शिंदे गटात
गुजरातमध्ये काँग्रेसच्या १५ दिवसांत २५ रॅली
बाबा रामदेव यांना धक्का; पतंजलीच्या पाच औषधांवर बंदी
कौन किसके शादी मे जा रहा है, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे का म्हणाले?
पालघरच्या टेक येथील औद्योगिक वसाहतीमध्ये राम हरी शर्मा यांच्या मालकीचा व्यावसायिक गाळ्यात संगणक आणि प्रिंटरच्या मदतीने हे चलन छापण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बनावट नोटा बाजारात आणण्याचा आरोपीचा हा पहिलाच प्रयत्न होता. आरोपींविरुद्ध भादंवि ४९८ अ (बनावट चलनी नोटा) ४८९ ब, (खऱ्या नोटा बनावट म्हणून वापरणे), ४९८ क (बनावट नोटा बाळगणे) आणि ३४ (सामान्य हेतू) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.