23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात अनेक शक्ती कपूर

ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात अनेक शक्ती कपूर

Google News Follow

Related

राज्यात वाढलेल्या महिला अत्याचाराबद्दल सरकारचा समाचार घेताना भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी या मंत्रीमंडळात अनेक शक्ती कपूर आहेत आणि त्यांचे फोटो केबिन मध्ये लावावेत असा टोला त्यांनी लगावला. राज्यपालांच्या अभिभाषणावर खेद व्यक्त करताना ते बोलत होते.

महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली. महाराष्ट्रात नुकत्याच घडलेल्या अनेक घटनांमुळे विधानसभेचे अधिवेशन चांगलेच वादळी होत आहे. भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी आपल्या भाषणातून ठाकरे सरकारवर जोरदार हल्ले चढवले.

राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल खेद

आपल्या भाषणाच्या सुरूवातीलाच त्यांनी राज्यपालांच्या अभिभाषणाबाबत खेद व्यक्त केला. या भाषणाबाबत बोलताना ते म्हणाले की, या भाषणात महाराष्ट्राच्या विकासाचा दृष्टीकोन, कोणतीही व्हिजन दिसत नाही. राज्यपाल घटनात्मक पद असून या पदावर असणाऱ्या राज्यपालांच्या वारंवार करण्यात आलेल्या अपमानाचा देखील त्यांनी उल्लेख केला. त्यातून सरकारने आपल्या कोत्या मनोवृत्तीचे दर्शन घडवल्याचे देखील त्यांनी सांगितले. एका सरकारी अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकारणी तुरूंगवासाची शिक्षा झालेल्या मंत्री मंडळातल्या एका सदस्याने राज्यपालांचा एसेंट्रिक म्हणून त्यांचा खूप मोठा अपमान महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच झाला असल्याचे ते म्हणाले.

पूर्ण निधीचा वापर नाहीच

राज्य शासनाने उपलब्ध निधीपैकी फेब्रुवारी पर्यंत केवळ ३१% निधीच वापरला, त्यावर देखील भातखळकरांनी जोरदार टिका केली. असलेला निधी खर्च करायचा नाही, तो खर्च करण्याची क्षमता निर्माण करायची नाही आणि केंद्र सरकारवर ढकलायचं असं धोरण या सरकारने वारंवार अवलंबलं आहे.

महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था

या अधिवेशनात पुणे पोलिसांच्या पत्रकार परिषदेवर देखील त्यांनी टिका केली. पोलिस आयुक्त पत्रकार परिषदेतून हसून निघून गेले ही या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती आहे. पुणे पोलिस पुजा चव्हाण प्रकरणात एफआयआर दाखल करणं अशक्य आहे, आणि सुसंस्कृत महाराष्ट्राची मान शरमेनं खाली झुकली आहे. अशा प्रकारे भातखळकरांनी सरकारवर टिका केली.

या सरकारच्या मंत्रिमंडळातील एकेका मंत्र्याबद्दल देखील ते बोलत होते. ललिता कुमारच्या खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा हवाला देऊन त्यांनी सांगितले, की पुरोगामी महाराष्ट्रात तक्रारदार महिलेचे चारित्र्य तपासले जाते. याच वेळी महाराष्ट्र हा तमोयुगाकडे निघाला असल्याची टिका देखील त्यांनी सरकारवर केली. त्यामुळे शक्ती कायदा महाराष्ट्रात आणणाऱ्या सरकारमध्ये अनेक शक्ती कपुर आहेत अशी कडक टिका त्यांनी सरकारवर केली.

भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांचे महाराष्ट्र विधानसभेतील भाषण –

गृहमंत्र्यांना टोला

भाजपाच्या काळात आमचे फोन टॅप केले जात असल्याचे सांगणारे सरकार नुसती चौकशी करण्याच्या घोषणा करते परंतु त्या चौकशीचा निकाल काही लावत नाही, असे ते म्हणाले. या सरकाने एल्गार परिषदेच्या संदर्भात पुणे पोलिसांचीच चौकशी करणार होते, परंतु एल्गारच्या संदर्भात पोलिसांनी केलेली अटक सर्वोच्च न्यायलयाने वैध ठरवल्याने पुणे पोलिसांची चौकशी होऊ शकणार नाही.

दुसऱ्या बाजूला राज्याच्या सुरक्षेबाबत देखील त्यांनी चिंता व्यक्त केली. डोंगरीमध्ये अंमली पदार्थांचा कारखाना सापडला तर महाराष्ट्राचे गृहमंत्री काय झोपा काढत होते का? अशी सणसणीत चपराक देखील त्यांनी गृहमंत्र्यांना लगावली.

त्याबरोबरच शार्जिल उस्मानी हा काय सरकारचा जावई आहे का असे देखील ते म्हणाले. त्याबरोबर मुंबईत काश्मिरच्या स्वातंत्र्याची भूमिका घेऊन बोलणाऱ्या मुलीवरील सर्व केसेस सरकारने रद्द केल्या त्यावरून त्यांनी सरकारवर निशाणा साधला.

हिंदुत्व आणि भाजपा

आम्हाला भाजपाकडून हिंदुत्व शिकण्याची गरज नसलेल्या सरकारने किमान हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून तरी हिंदुत्व शिकावे असे देखील ते म्हणाले. या सरकारने सावरकर पुण्यतिथीनिमित्त एक ट्वीट देखील केले नाही याबाबत खंत व्यक्त करून, सरकारला सावरकरांचा विसर पडला असल्याचे त्यांनी सांगितले.

कोविड

ज्या राज्यात मृत्युदर आणि रुग्णदर जास्त आहे, त्या राज्याने लसीकरणार आघाडी घेण्याच गरज त्यांनी बोलून दाखवली. मात्र सरकार लसींबाबत संभ्रम निर्माण करत आहे. कोवॅक्सिन भारतात तयार झालेली आणि परदेशातही नावाजली गेलेली लस असल्याचे त्यांनी सांगितले. कोविड काळात अनेक राज्यांनी शाळांतील फि मध्ये सूट दिली मात्र महाराष्ट्राने दिली नाही. यावेळी त्यांनी मुंबईतील वाढलेल्या टॅक्सी आणि रिक्क्षा भाड्यावरून देखील सरकारवर टिका केली. सरतेशेवटी राज्यपालांच्या भाषणावर खेद व्यक्त करून त्यांनी आपले भाषण संपवले.

त्यांच्या भाषणात विरोधी पक्षाकडून व्यत्यय आणण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. मात्र त्याला देखील आमदार अतुल भातखळकर यांनी चोख उत्तर दिले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा