शनिवारी हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडले. हिमाचलचे मतदान पार पडल्यानंतर काँग्रेसने आपले लक्ष आता गुजरातच्या विधानसभा निवडणुकीवर केंद्रित केले आहे. काँग्रेस येत्या १५ दिवसांत गुजरातमध्ये एकूण २५ मेगा रॅली काढणार आहे.
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि नेते राहुल गांधी हे गुजरात निवडणुकीच्या प्रचारासाठी जाणार असल्याची चर्चा आहे. तसेच या रॅलीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, अशोक गेहलोत आणि भूपेश बघेल हे दोन मुख्यमंत्री याशिवाय काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्याशिवाय पक्षाचे बडे नेते उपस्थित राहणार आहेत. येत्या १५ दिवसांत काँग्रेस २५ मेगा रॅली काढणार असून, त्यामध्ये १२५ विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.
राहुल गांधी यांनी फेब्रुवारी २०२२ मध्ये द्वारका येथील राज्यस्तरीय चिंतन शिबिर येथे पक्षाच्या निवडणूक प्रचाराची सुरुवात केली. त्यानंतर गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने ‘मूक प्रचार’ योजना राबवली. सध्या राहुल गांधी भारत जोडो यात्रेसाठी महाराष्ट्रात आहेत.
हे ही वाचा:
बाबा रामदेव यांना धक्का; पतंजलीच्या पाच औषधांवर बंदी
मुंबईसह ठाणे पोलीस दलात मोठा फेरबदल
वांगं तेच, बिरबल आणि राऊतांची मजबुरीही सारखीच….
जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांचा मजुरांवर अंदाधुंद गोळीबार
दरम्यान, गुजरात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि आम आदमी पार्टी मोठ्या प्रमाणावर प्रचार करत आहे. आता यामध्ये काँग्रेस पक्षाची भर पडली आहे. मात्र, गुजरातमध्ये भाजपाचा विजय होणार, अशा लोकांच्या प्रतिक्रिया सोशल मीडियामधून समोर येत आहेत. नुकत्याचं काल हिमाचल प्रदेशमध्ये पार पडलेल्या मतदानात एका आजीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. मी फक्त मोदीजींना मतदान करायला आली आहे. मोदीजींनी आम्हाला सर्व काही दिलं अशी प्रतिक्रिया त्या आजीने दिली होती. काही दिवसांपूर्वीच देशातील सहा राज्यांतील विधानसभेच्या सात जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाने चार जागांवर विजय मिळवला होता. तसेच वर्षाच्या सुरुवातीला उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांची विधानसभा निवडणूक झाली होती. यामध्ये पंजाब वगळता उर्वरित चार राज्यांत भाजपने विजय मिळवला होता.