योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीच्या पाच औषधांवर बंदी घालण्यात आली आहे. पतंजली ग्रुपच्या पाच औषधांचे उत्पादन बंद करण्याचे आदेश उत्तराखंड आयुर्वेद व युनानी परवाना प्राधिकरणाने दिले आहेत. औषधांच्या जाहिराती दिशाभूल करणाऱ्या असल्याचा ठपका ठेवत, ही कारवाई करण्यात आली आहे.
पतंजली समूहासाठी हा धक्का मानला जातं आहे. केरळचे डॉक्टर के.व्ही बाबू यांनी पंतजलीच्या औषधांविरोधात तक्रार केली होती. त्यानंतर प्राधिकरणाच्या वतीने औषधांची तपासणी करण्यात आली. या औषधांच्या जाहिरातींवरही आक्षेप घेण्यात आला होता. हा दावा दिशाभूल करणारा असल्याचं प्राधिकरणाला आढळल्यानंतर अखेर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. या औषधांच्या जाहिराती तातडीने बंद करण्यास सांगण्यात आले आहे.
पतंजली मार्फक मधुग्रीट, थायरोग्रीट, बीपीग्रीट यासोबत लिपिडोम टॅबलेट आणि आयग्रीट गोल्ड, टॅबलेट अशा एकूण पाच औषधांच्या उत्पादनावर बंदी घालण्यात आली आहे. बीपी, डायबेटीस याच्यासोबत हाय कोलोस्ट्रॉल यासारख्या आजारांवर ही औषधं प्रभावी असल्याचा दावा केला जात होता. दिव्य फार्मसीमार्फत या औषधांचे उत्पादन केले होते. आता या औषधांचं उत्पादन बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर या औषधांचं पुन्हा उत्पादन करायचं असेल तर त्यासाठी पुन्हा परवानगी घेणं बंधनकारक असणार आहे.
हे ही वाचा:
‘माझे तिकीट उद्धव ठाकरे यांनी कापले’
हिमाचलमध्ये आजी म्हणाली, मोदी हमारा बच्चा है, उसने देश बचाया!
महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक, १२ हजार रोजगार होणार निर्माण
‘या’ कारणामुळे ट्विटरच्या ‘ब्लू टिक’ पेड सबस्क्रिप्शनचा निर्णय मागे
मात्र, या आदेशाची प्रत मिळाली नसल्याचे रामदेव बाबा यांनी म्हटले आहे. कारवाई चुकीची असल्याचे रामदेव बाबा यांनी म्हटले आहे. तसेच आयुर्वेदाला विरोध करणाऱ्यांकडून मुद्दाम केली गेल्याचाही आरोप रामदेव बाबा यांच्याकडून करण्यात आला आहे.