१९९६ च्या दहशतवादी खटल्यातील आरोपी अब्दुल माजीदला गुजरात दहशतवादविरोधी पथकाने अटक केली आहे. झारखंड मध्ये लपलेल्या माजीदला २७ डिसेंबरला पोलिसांनी ताब्यात घेतले. माजीद हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि अबू सालेम यांच्या सोबत मेहसाणा मधील हत्यारांच्या तस्करीत वॉन्टेड होता.
दाऊदचा निकटवर्तीय माजिद हा झारखंडमधील जमशेदपूर शहरात नाव बदलून राहात होता. मोहम्मद कमाल या नावाने तो वावरात आहे अशी खबर गुजरातच्या दहशवाद विरोधी पथकाला लागली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. चौकशीमध्ये मोहम्मद कमालने तोच ‘वॉन्टेड’ अब्दुल माजिद असल्याचे कबुल केले.
१९९६ साली पाकिस्तानमधून राजस्थानमार्गे बेकायदेशीर शस्त्रसाठा भारतात आला. यात ४ किलो आर.डी.एक्स, १० डेटोनेटर्स, १३० पिस्तूल, ११३ मॅगझीन आणि ७५० कार्ट्रिजेस