गेल्या काही वर्षात राज्याला वरदान ठरणारे प्रकल्प थंडावले आहेत. या प्रकल्पांना चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. भंडाऱ्यातील गोसीखुर्द प्रकल्प पूर्व विदर्भासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. हा प्रकल्प २०२५ पर्यंत पूर्णत्वास नेण्याचा राज्य सरकार प्रयत्न करेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री शिंदे यांनी शनिवारी गोसीखुर्द प्रकल्पाचा पाहणी दौरा केला. या पाहणी दौऱ्यानंतर त्यांनी ही माहिती दिली आहे.
गोसीखुर्द प्रकल्पाला चालना दिल्यानंतर या भागातील ७०० गावं ओलिताखाली येतील. त्याचप्रमाणे जवळपास अडीच लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल. त्यामुळे अडीच लाख लोकांना पिण्याचे पाणी मिळू शकणार आहे. राज्याच्या दृष्टीने देखील हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाकांक्षी असून त्यामुळे संपूर्ण या भागात आमूलाग्र बदल घडणार आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.
या प्रकल्पामुळे जल पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळू शकेल.
देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित आता येऊ शकेल एव्हढ्या संधी या प्रकल्पामध्ये आहेत. केंद्राकडून राज्यातील प्रकल्पांसाठी दोन लाख कोटी रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे. केंद्रातील मोदी सरकारने राज्यातील प्रकल्पांना प्राधान्य दिले आहे. त्यामुळे राज्य व केंद्र सरकार मिळून हा प्रकल्प पूर्ण करण्यात येईल. हा प्रकल्प पूर्ण करण्यामध्ये कोणती अडचण येणार नाही आणि तो वेळेत पूर्ण झाला तर लोकांनाच त्याचा फायदा होईल असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
हे ही वाचा:
शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ८६५ वधारला तर निफ्टीतही वाढ
छत्रपती शिवाजी महाराजांची ‘ती’ ऐतिहासिक तलवार येणार महाराष्ट्रात?
मुख्यमंत्री, पंतप्रधान सडक योजनेतून राज्याला ४०० कोटी
संजय राऊत फडणवीसांना भेटणार; मातोश्रीवर संशयाचा ९ किमी लांबीचा ढग
काय आहे गोसेखुर्द प्रकल्प
गोसीखुर्द धरण प्रकल्प १९८३ मध्ये जाहीर झाला होता. त्यावेळी प्रकल्पाची नियोजित किंमत ३७२ कोटी रुपये होती. परंतु गेली चार दशके रेंगाळलेल्या गोसीखुर्द धरणाचे बजेट २० हजार कोटींच्यावर गेले आहे. या प्रकल्पाला चालना देण्याच्यादृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धरणावर शनिवारी पाहणी दौरा केला. पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि प्रशासनातील इतर अधिकाऱ्यांकडूनगोसीखुर्द धरणाच्या कामासंदर्भात माहिती घेऊन त्याचा आढावा घेतला. या धरणात जलपर्यतं सुरु कारण्याच्यादृष्टीनेही चर्चा यावेळी करण्यात आली.