सर्वोच्च न्यायालयाने एका आदेशात गोध्रा कटाचा सूत्रधार अब्दुल रहमान अब्दुल मजीदचा जामीन मार्च २०२३ पर्यंत वाढवला आहे. अब्दुलच्या पत्नीच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. तो आधीच जामिनावर बाहेर आहे. गोध्रा येथे कारसेवकांनी भरलेल्या साबरमती ट्रेनची बोगी मुस्लिम धर्मांध जमावाने जाळली. गुजरातमध्ये त्याचा हिंसक प्रतिकार झाला होता.
२७ फेब्रुवारी २००२ रोजी गोध्रा स्थानकावर कारसेवकांनी भरलेल्या साबरमती एक्स्प्रेसच्या एस-६ बोगीला मुस्लिम जमावाने आग लावली होती. यामध्ये ५९ कारसेवकांना जिवंत जाळण्यात आले होते., बोगीत पुरुषांसह महिला आणि लहान मुलेही होती. यानंतर आग विझवण्यासाठी आलेल्या अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांवर जमावाने दगडफेक केली. या प्रकरणामध्ये अब्दुल मजीदला शिक्षा झाली आहे. त्याने २० वर्षे तुरुंगवास भोगला आहे. त्यानंतर त्याने सुटकेसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ज्यावर अजून निर्णय व्हायचा आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती डी. वाय चंद्रचूड, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती जे. बी पार्डीवाला यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. न्यायालयाने मजीदच्या पत्नीला गर्भाशयाचा कर्करोग आणि दोन मुलींचे अपंगत्व लक्षात घेऊन दिला आहे.
हे ही वाचा:
शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ८६५ वधारला तर निफ्टीतही वाढ
छत्रपती शिवाजी महाराजांची ‘ती’ ऐतिहासिक तलवार येणार महाराष्ट्रात?
मुख्यमंत्री, पंतप्रधान सडक योजनेतून राज्याला ४०० कोटी
संजय राऊत फडणवीसांना भेटणार; मातोश्रीवर संशयाचा ९ किमी लांबीचा ढग
गोध्रा घटनेनंतर संपूर्ण गुजरातमध्ये दंगली उसळल्या. या दंगलींमध्ये एक हजाराहून अधिक लोक मारले गेले होते. यात ७९० मुस्लिम आणि २५४ हिंदू होते. गोध्रा हत्याकांडानंतर २८ फेब्रुवारी रोजी अहमदाबादच्या गुलबर्ग हाउसिंग सोसायटीमध्ये बेकायदेशीर जमावाने ६९जणांची हत्या केली होती. याच सोसायटीत राहणारे काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांचाही मृत्यू झालेल्यांमध्ये समावेश आहे. या दंगलींमुळे राज्यातील परिस्थिती इतकी बिघडली की परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तिसऱ्या दिवशी लष्कराला तैनात करावे लागले होते.