ट्विटरवर ‘ब्लू टिक’ असणाऱ्यांना प्रति महिना पैसे मोजावे लागणार असं, एलॉन मस्क यांनी जाहीर केलं होत. त्यानुसार, अँपल अँप स्टोअरमध्ये अँप अपडेट करून ब्लू टिक व्हेरिफिकेशनसाठी आठ डॉलर आकारण्यास सुरुवात सुद्धा झाली होती. मात्र, एलॉन मस्क यांनी ट्विटरवरील ब्लू टिकसाठीच्या पेड सबस्क्रिप्शनचा निर्णय रद्द केला आहे. बनावट खात्यांमध्ये वाढ झाल्याने ट्विटरने ही सेवा तुर्तास मागे घेतली आहे, अशी माहिती कंपनीच्या सुत्राने दिली आहे.
एलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतले आणि त्यांनी ट्विटरमध्ये ऐतिहासिक बदल घडवण्यास सुरुवात केली होती. त्यामध्येच ब्लू टिक संदर्भतील निर्णय एलॉन मस्क यांनी घेतला होता. मात्र, बनावट खात्यांमध्ये वाढ झाल्याने ट्विटरने ही सेवा तुर्तास मागे घेतली आहे, अशी माहिती कंपनीच्या सुत्राने दिली आहे. युजर्संकडून मोठ्या ब्रँडच्या नावांचा गैरवापर होत असल्याचंही पुढे आले आहे. ज्या ग्राहकांनी याआधी हे सबस्क्रिप्शन घेतलं आहे, त्यांच्या खात्यांवर ही सेवा सुरू राहणार आहे.
हे ही वाचा:
आरेमध्ये बिबट्याचा महिलेवर जीवघेणा हल्ला
गजानन कीर्तिकरांचा उद्धव गटाला रामराम ; शिंदे गटात सामील
शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ८६५ वधारला तर निफ्टीतही वाढ
छत्रपती शिवाजी महाराजांची ‘ती’ ऐतिहासिक तलवार येणार महाराष्ट्रात?
व्हेरिफाईड ‘ब्लू टीक’साठी सबस्क्रिप्शन सुरू केल्यानंतर बनावट खात्यांमध्ये वाढ झाली. एका वापरकर्त्याने त्याच्या खात्यावर सुपर मारिओचा फोटो वापरून आक्षेपार्ह ट्वीट केले. तर दुसऱ्या एका वापरकर्त्याने फार्मा कंपनी ‘इली लीली’ या नावाचा वापर करत इंन्सुलीन मोफत देण्यात येणार असल्याचे म्हटलं आहे. अशा घटनांमुळे ब्लू टिक संदर्भातील निर्णय मागे घेतला असल्याची माहिती आहे.