मुंबईत सध्या मोबाईल चोरीच्या घटना वाढत चालल्या आहेत. बेस्ट बस, रेल्वे स्थानक, पादचारी मार्ग यासारख्या रहदारीच्या मार्गावरून मोठ्या प्रमाणात मोबाईल चोरीच्या घटना वाढत आहेत. त्यातही काही सराईत चोर हात चलाखीने मोबाईल लंपास करण्यास माहीर आहेत. अशीच एक घटना मुंबई उपनगरातील कुरार पोलिस स्थानकाच्या हद्दीत घडून आली आहे. त्यामध्ये पोलिसांनी एका रिक्षा चालकाला अटक केली आहे. तसेच हा रिक्षा चालक चोरीच्या मोबाईलचा लॉक उघडायला गेला असता, हा सराईत चोर पोलिसांच्या तावडीत सापडला. याप्रकरणी पोलीस सराईत चोराची कसून तपासणी करीत आहेत.
सायकलवर चहा विकणाऱ्या एका चहा विक्रेत्याच्या मोबाईल काही दिवसांपूर्वी चोरी झाला होता. या चहा विक्रेत्याने याची तक्रार कुरार पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. तर अटक करण्यात आलेल्या या रिक्षा चालकाचे नाव सौरभ तिवारी असून हा सराईत मोबाईल चोर असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच पोलिसांनी या तिवारीवर गुन्हा दाखल केला असून, अटक ही करण्यात आले आहे. मोबाईल चोरून झाल्यावर त्यातले सिमकार्ड फेकून देण्याची तिवारीची कार्यपद्धती होती.
हे ही वाचा:
या प्रसिद्ध अभिनेत्याचा व्यायाम करताना झाला मृत्यू
२० नोव्हेंबरला मध्यरेल्वेचा २७ तासांचा मेगाब्लॉक
गजानन कीर्तिकरांचा उद्धव गटाला रामराम ; शिंदे गटात सामील
शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ८६५ वधारला तर निफ्टीतही वाढ
यामुळे चोरलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी पोलिसांना अडचण निर्माण होत असे, तसेच हा चोर मोबाईलचा लॉक उघडण्यासाठी एका मोबाईलच्या दुकानात गेला चोरी केलेल्या मोबाईलची दुकानदाराला लॉक उघडण्यासाठी विनंती करू लागला. दुकानदाराने मोबाईलच्या बिलाची मागणी केली असता उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. संबंधित दुकानदाराला तिवारीवर संशय आल्यानंतर त्याने लगेच महिती पोलिसांना दिली. त्यानांतर कुरार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंकज वानखेडे आणि त्यांचे पथक मिळून तिवारीच्या मुसक्या आवळल्या.