ठाकरे गटाचे जेष्ठ खासदार गजानन कीर्तिकर यांनी उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे. गजानन कीर्तिकर यांनी ठाकरे गटाला रामराम करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे.
मुंबईतील माहीम विधानसभा नागरिक सत्कार सोहळ्यानिमित्त रविंद्र नाट्य मंदिरात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित गजानन कीर्तिकर शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्यांचा हा निर्णय ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जातं आहे.
मागील काही दिवसांपासून कीर्तिकर हे उद्धव ठाकरे यांच्या कोणत्याचं कार्यक्रमात सामील झाले नव्हते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी ते गणपती दर्शनासाठी गेले होते. तेव्हापासून ते शिंदे गटात सामील होणार अशी चर्चा रंगली होती. गजानन कीर्तिकर हे मागील ५० वर्षणापासून राजकारणात आहेत. तर मागील ३० वर्षांपासून ते संसदेत खासदार होते.
हे ही वाचा:
शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ८६५ वधारला तर निफ्टीतही वाढ
छत्रपती शिवाजी महाराजांची ‘ती’ ऐतिहासिक तलवार येणार महाराष्ट्रात?
मुख्यमंत्री, पंतप्रधान सडक योजनेतून राज्याला ४०० कोटी
संजय राऊत फडणवीसांना भेटणार; मातोश्रीवर संशयाचा ९ किमी लांबीचा ढग
गजानन कीर्तिकर यांना ठाकरे गटातील एकनिष्ठ खासदार मानले यायचे. पण आता त्यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केल्याने शिंदे गटाच्या खासदरांची संख्या तेरा वर पोहोचली आहे. तसेच नुकतचं दिपाली सय्यद यांनी सुद्धा त्या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते. शनिवारी त्यांचा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश होणार आहे.