दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर फळाला आली आहे. राज्य सरकारने दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय सुरु करण्यासाठी मंजुरी दिली आहे. दिव्यांगांसाठी सातत्याने झटणारे आमदार बच्चू कडू यांनी ही मागणी अनेकदा लावून धरली होती . या मागणीसाठी त्यांनी अनेकदा निदर्शनेही केली होती. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलंय.
आमदार आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार दिव्यांग क्रांती आंदाेलन संस्थेने दिव्यांगांसाठीच्या स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करण्यासाठी सातत्याने संघर्ष केला. अनेकदा स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्या संघर्षाला आता यश आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यासाठी मान्यता दिल्याची माहिती बच्चू कडूंनी दिली. या मान्यतेनंतर मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराजवळ लाडू वाटून बच्चू कडू यांनी या निर्णयाचं स्वागत केलं.
हे ही वाचा:
अफझलखानाच्या मृत्यूदिनीच त्याच्या कबरीभोवतालच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा
अडवाणी, जोशी आणि उमा भारती यांच्या निर्दोष मुक्ततेविरोधातील याचिका फेटाळली
आयटम गर्ल राखी सावंत सह दोघीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल
फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सऐपमध्येही आता नोकर कपात
दिव्यांग मंत्रालयाच्या संदर्भात बुधवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला अशी माहिती आमदार बच्चू कडू यांनी दिली. बच्चू कडू म्हणाले, दिव्यांगांच्या हक्कांसाठी आम्ही गेली २५ ते २६ वर्षे लढा देतोय, त्याला आता यश आलं आहे. जागतिक अपंग दिनादिवशी म्हणजे ३ डिसेंबर रोजी याची घोषणा करण्यात येणार आहे. येत्या १५ दिवसांत हे शासन मंत्रालय स्थापन करणार आहे. दिव्यांग मंत्रालय हा देशपातळीवरील मोठा निर्णय आहे. यासाठी मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचं आभार मानतो असे ते म्हणाले.२०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यामध्ये अपंग व्यक्तींची लोकसंख्या २९,५९,३९२ इतकी आहे. राज्याच्या एकुण लोकसंख्येपेक्षा अपंग व्यक्तींची संख्या २.६३ इतकी टक्के आहे.