शारीरिक व्यंग असले तरी त्यावर मात करून काही तरी अचाट कामगिरी करण्याची अशी अनेक उदाहरणे आपण आजूबाजूला पहात असतो. चला हवा येऊ द्या या विनोदी मालिकेतून घराघरात पोहचलेल्या अंकुर वाढवे या अभिनेत्यानेही आपल्या व्यंगत्वावर मत करत अलौकिक कामगिरी केली आहे. अंकुर याने यासंदर्भातील एक पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली असून ती व्हायरल होत आहे. त्याच्या या कामगिरीबद्दल अभिनेते आणि त्याच्या चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
‘ सांगायला आनंद होत आहे की, अपंग प्रवर्गातून NET (नॅशनल एलिजिबल टेस्ट) २०२२ performing arts विषयामध्ये JRF घेऊन भारतातून एकमेव परीक्षाार्थी म्हणून मी पास झालो’ असे अंकुर याने आपल्या इंस्टाग्राम पोस्टवर शेअर केलं आहे. त्याची ही पोस्ट सोशल मिडीयावर सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे.
हे ही वाचा:
अफझलखानाच्या मृत्यूदिनीच त्याच्या कबरीभोवतालच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा
अडवाणी, जोशी आणि उमा भारती यांच्या निर्दोष मुक्ततेविरोधातील याचिका फेटाळली
आयटम गर्ल राखी सावंत सह दोघीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल
फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सऐपमध्येही आता नोकर कपात
अंकुर हा अभिनेताच नाही तर तो एक उत्तम कवी देखील आहे. त्याचा ‘पुन्हा प्रेमगीत गाण्यासाठी’ हा कविता संग्रहही प्रकाशित झाला आहे . आपल्या नाट्यक्षेत्राच्या सुरवातीच्या काळात त्याने अभिनेते संजय नार्वेकर यांच्यासोबत एका नाटकात काम केलं होतं .त्यानंतर अंकुरणे गाढवाचं लग्न, सर्किट हाऊस,आम्ही सारे फर्स्ट क्लास , सायलेन्स , कन्हैय्या अशा अनेक नाटकांमध्ये भूमिका साकारून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली . ‘जलसा’ या मराठी चित्रपटातही त्यानं काम केलं. ‘चला हवा येऊ द्या’मध्येही काम करण्याची संधी मिळाल्यावर त्याचेही त्याने सोने केले. ‘चला हवा येऊ द्या’च्या माध्यमातून त्याने घराघरात आपली ओळख निर्माण केली आहे.