25 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरविशेषअफझलखानाच्या मृत्यूदिनीच त्याच्या कबरीभोवतालच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा

अफझलखानाच्या मृत्यूदिनीच त्याच्या कबरीभोवतालच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा

न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई होत असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांचे म्हणणे

Google News Follow

Related

अवघ्या स्वराज्याचा शत्रू असलेल्या अफझल खानच्या कबरीभोवती असलेली अनधिकृत बांधकामे पाडण्यास स्थानिक प्रशासनाने गुरुवारी सुरुवात केली. या भागात प्रचंड बंदोबस्त ठेवून ही कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे १० नोव्हेंबर १६५९ या दिवशी अफझल खानाला छत्रपती शिवाजी महाराजांनी मारले. त्याच दिवशी ही कारवाई केली जात आहे.

यासंदर्भात शासनाने ठोस पावले उचलली असून स्थानिकांना किंवा माध्यमांनाही तिथे जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी या अफझलखानाचा प्रतापगडच्या पायथ्याशी कोथळा बाहेर काढला होता आणि नंतर त्याची तिथेच कबर खणण्यात आली. आता त्या कबरीभोवती अनेक अनधिकृत बांधकामे, वाढीव बांधकामे करण्यात आली आहेत. ही बांधकामे जिल्हा प्रशासनाने उद्ध्वस्त करण्याचे ठरविले आणि तशी कारवाई सुरू झाली आहे.

अनधिकृत बांधकामावर कारवाई करताना कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून माध्यम प्रतिनिधी आणि स्थानिकांना ६ ते ७ किमी लांब ठेवण्यात आले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसारच ही कारवाई केल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

अफझल खानाची प्रतापगडच्या पायथ्याशी असलेली कबर पाडण्यात यावी अशी मागणीही काही संघटनांनी केलेली आहे. मात्र ही कबर आहे तशीच आहे, त्याच्या भोवती असलेले वाढीव बांधकाम जे अनधिकृत आहे, ते उद्धवस्त करण्यात येत आहे.

हे ही वाचा:

अडवाणी, जोशी आणि उमा भारती यांच्या निर्दोष मुक्ततेविरोधातील याचिका फेटाळली

पाकिस्तान अंतिम फेरीत धडकला पण भारत पोहोचेल?

एटीएममध्ये १ लाख ४० हजार रोख रक्कमेची फसवणूक

खासदार संजय राऊत यांना जामीन

 

मंत्री शंभूराज देसाई यांनी यासंदर्भात सांगितले की, ही कारवाई न्यायालयाच्या आदेशानुसारच होत आहे. त्यात कबरीच्या भोवती असलेले अनधिकृत बांधकाम काढण्यात येत आहे. तिथे चित्रिकरण करण्यास कुणालाही परवानगी नाही.

यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजब विधान केले आहे. ही कबर उद्धवस्त केली तर शिवाजी महाराजांनी केलेल्या पराक्रमाच्या आठवणी पुसल्या जातील.

या कबरीच्या बाजूला काही खोल्या बांधण्यात आल्या होत्या, त्या उद्ध्वस्त करण्यात येत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा