राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर शिंदे गटाचे आमदार आणि महाराष्ट्राचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. सत्तार यांनी वापरलेल्या अपशब्दानंतर मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीच्या संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत त्यांच्या औरंगाबादच्या सिल्लोड येथील राहत्या घरावर तुफान दगडफेक केली. मुंबईतही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सत्तारांच्या बंगल्याच्या काचा फोडल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून विविध ठिकाणी तीव्र निषेध करण्यात आला. राष्ट्रवादीच्या संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी खट्टर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
सिल्लोडमध्ये राष्ट्रवादीच्या तरुण कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तार यांच्या बंगल्याच्या गेटवर चप्पल फेकून मारल्या. काठ्या हाणल्या. सत्तारांच्या घरावर दगडफेक केली.यावेळी पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रचंड प्रयत्न केला. सत्तर यांनी महिलांचा अपमान केला आहे. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. ते जोपर्यंत सुप्रिया सुळे यांची माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांच्या घरीच काय पण कार्यालयाबाहेर आंदोलन करु. सत्तार यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही अशी टोकाची भूमिका घेतली होती. त्यामुळे पोलिसांना या कार्यकर्त्यांना नियंत्रणात आणणे अवघड जात होते.
हे ही वाचा:
‘अजित पवारांची कुणालाही गॅरंटी नाही’
‘मराठी मुस्लिम संकल्पनेचा प्रचार करणारे तोतया’
एका लग्नाची पुढची गोष्टचा १२,५०० वा प्रयोग, राज-फडणवीस उपस्थित राहणार
दिवंगत पत्रकार पांडुरंग रायकर यांना राष्ट्रवादीकडून ती मदत अद्याप नाही, पत्नीने केली विनंती
…म्हणून मी माफी मागतो: सत्तार
अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या आधीच्या विधानावर वाद निर्माण झाल्यानंतर स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, “मी माझे म्हणणे मांडताना महिला आणि भगिनींवर अत्याचार केलेले नाहीत. जे लोक आमची बदनामी करत आहेत त्यांच्याबद्दल मी विधान केले आहे. सुप्रिया सुळे यांच्याबद्दल बोलताना मी त्यांचा अपमान करणारे कोणतेही वक्तव्य केलेले नाही. तरीही, माझ्या बोलण्याने त्यांचा अपमान झाला आहे, असे महिला भगिनींना वाटत असेल तर मी खेद व्यक्त करतो.