25 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरधर्म संस्कृतीकुंकू टिकली वादावर शरद पोंक्षे यांनी केला हा फोटो शेअर

कुंकू टिकली वादावर शरद पोंक्षे यांनी केला हा फोटो शेअर

संभाजी भिडे वादग्रस्त विधान

Google News Follow

Related

हिंदुत्वाबद्दलच प्रेम आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर असलेली निष्ठा आणि त्यांचे विचार याबद्दल पोंक्षे नेहमीच स्पष्ट भूमिका मांडत असतात. आता त्यांनी केलेली पोस्ट देखील चर्चेचा विषय ठरली आहे. या पोस्ट मध्ये त्यांनी ”एका चर्चच्या बाहेर लावलेला फलक. यात स्त्रियांनी काय कपडे घालावे याच्या सूचना आहेत. इथे स्लिवलेस, शॉर्ट्स, क्रॉप टॉप किंवा मिनी घालून गेल्यास, कपडे बदलून या मगच सोडेन असे पाद्री सांगतात. पाद्रींचे आडनाव भिडे/कुलकर्णी नसल्याने यात स्त्रीच्या स्वातंत्र्याचा अपमान होत नाही असे म्हटले आहे. सद्य स्थितीशी ह्याचा काहीही संबंध नाही फक्त जे वाटलं दिसलं ते पोस्ट केलं.” असही त्यांनी पुढे म्हटलं आहे.

सध्या राज्यभर कुंकू टिकलीचा वाद सुरु आहे. आता या वादावर अभिनेते शरद पोंक्षे यांनी देखील आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. विविध समाज माध्यमांवर सामाजिक आणि राजकीय भाष्य करणाऱ्या शरद पोंक्षे यांनी कुंकू टिकली प्रकरणात कोणतेही भाष्य केलेले नाही. त्यांनी फक्त एक फोटो आपल्या पोस्टमध्ये शेअर केला आहे.

हे ही वाचा:

सोनाली फोगट हत्या प्रकरणात रेस्टॉरंटचा मालक अटकेत

दहशतवादी अबू हंजलाला अटक

‘तर उद्धव ठाकरेंनी महापौर बंगल्याची किंमत सरकारकडे जमा करावी’

श्रीलंकेचा फलंदाज दानुष्काला बलात्काराच्या आरोपात अटक

 

फोटोला त्यांनी फक्त एक शीर्षक दिले आहे. ‘एका चर्चच्या बाहेर लावलेला फलक. यात स्त्रियांनी काय कपडे घालावे याच्या सूचना आहेत. पाद्रींचे आडनाव भिडे/कुलकर्णी नसल्याने यात स्त्रीच्या स्वातंत्र्याचा अपमान होत नाही.’ असं म्हणत त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या या वादग्रस्त विधानाचे राज्य भारत पडसाद उमटले आहेत. महिला संघटनांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. महिला आयोगाने देखील भिदे यांच्या विधानाची दखल घेत त्यांना नोटीस पाठवली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा