पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यापासून काही माध्यमांमध्ये जाणीवपूर्वक विरोधात बातम्या दिल्या जात आहेत. पंतप्रधानांनी एखादे विधान केले कि त्यावर टीका टिप्पणी करणे सुरु असते. इंडिया टुडेच्या परिसंवादात यावरूनच पत्रकारांना झापण्यात आले. केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची मुलाखत सुरु होती. मुलाखतकार राहुल कंवल यांनी विचारलेल्या एक प्रश्नावर गोयल एकदम संतापले.. आणि म्हणाले टीआरपी वाढवण्यासाठी तुम्ही वाद निर्माण करू शकता .. तुम्हाला शुभेच्छा… त्यानंतरही काही वेळ दोघांमध्ये मध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे बघायला मिळाले.
सध्या दिल्ली आणि हिमाचल प्रदेशमध्ये निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्याच संदर्भात बोलताना कंवल म्हणाले की स्पर्धा चांगली असायला हवी मग जिंकून कोणीही येऊ देत, स्पर्धा बरोबरीची हवी. सामना चांगला हवा. मग लोकांना मजा येते. जर एकमार्गी असेल आणि जिंकून कोण येणार हे आधीच माहिती असेल तर मजा येत नाही. यावर गोयल यांनी लगेच प्रश्न विचारला की मग टीआरपी बाबतही तुमचे हेच मत आहे का ? यावर कंवल म्हणाले, नाही टीआरपीमध्ये इंडिया टुडेच पुढे पाहिजे यात दुमत नाही. यावर गोयल म्हणाले कि ती तुमची मजबुरी आहे. जर देशात बीजेपीची लाट असेल तर मग तुमचे इंडिया टुडे चॅनल बंद पडेल. इंडिया टुडे काँकलेव्ह अपयशी ठरेल. त्यामुळे तुम्ही वाद निर्माण करण्यासाठी कोणालाही उद्युक्त करण्यासाठी अस्वस्थ झालेलं असता. तुम्ही ते करा.. आमच्या ते हिताचे आहे.
हे ही वाचा:
सोनाली फोगट हत्या प्रकरणात रेस्टॉरंटचा मालक अटकेत
‘तर उद्धव ठाकरेंनी महापौर बंगल्याची किंमत सरकारकडे जमा करावी’
श्रीलंकेचा फलंदाज दानुष्काला बलात्काराच्या आरोपात अटक
आम आयाम आदमी पक्षाच्या नेत्यांनी मोदींनाही सोडले नाही. तुम्ही जितके त्यांच्याबद्दल दाखवाल तितके ते आमच्या हिताचे आहे असेही गोयल यांनी स्पष्ट केले. अनेक अँकर मोदी यांच्या विरोधात नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करतात अगदी दिवसभर करतात. पण देशात तयार झालेलं नॅरेटिव्ह मोदींच्या बाजूने आहे. मोदींवर पूर्ण देश विश्वास करत आहे असे त्यांनी ठामपणे सांगितले .