सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तौयबाला जोरदार झटका दिला आहे. लष्कराचं जाळं गुप्तपणे तयार करणारा कमांडर अबू हंजला याला सुरक्षा दलांनी अटक केली आहे. पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफच्या संयुक्त टास्क फोर्सने चंदरगीर हाजीन इथे केलेल्या विशेष कारवाईदरम्यान त्याला अटक केली आहे.
उत्तर काश्मीरमधील बांदीपोरामधील सुरक्षा दलांनी अबू हंजला अटक केली आहे. जम्मू काश्मीरमध्ये असलेला लष्करचा कमांडर बाबर भाईच्या अबू हंजला सतत संपर्कात होता. पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफच्या संयुक्त टास्क फोर्सने केलेल्या विशेष कारवाईदरम्यान त्याला अटक केली आहे. चंदेरगीरमध्ये जेव्हा वाहनांमधील लोकांची तपासणी केली जात होती, तेव्हा अबू हंजला घाबरला आणि त्यानं तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्याला सैनिकांनी रोखलं आणि विचारपूस केली असता, तो एकाही प्रश्नाचं अचूक उत्तर देऊ शकला नाही. त्याची चौकशी केली असता तो अबू हंजला आहे असे उघड झाले आणि त्याला अटक करण्यात आली, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे.
हे ही वाचा:
अंधेरी पोटनिवडणुकीत मतदारांचे नोटालाही प्राधान्य
श्रीलंकेचा फलंदाज दानुष्काला बलात्काराच्या आरोपात अटक
हाऊसकिपिंग करणाऱ्यानेच घर ‘साफ’ केले, २४ तासांत जेरबंद
नितेश राणेंचा मोर्चा आणि त्याच रात्री लागला मुलीचा शोध
त्याचाकडे लष्कराचे पोस्टर्स, जिहादी साहित्य आणि शस्त्रास्त्रांचा साठाही सापडला आहे. तसेच एक हँड ग्रेनेड आणि असॉल्ट रायफलची तीन काडतुसं त्याच्याकडे सापडली आहेत.पोलिस, लष्कर आणि सुरक्षा यंत्रणा त्याची चौकशी करत आहेत. अबू हंजला हा बांदीपोर जिल्ह्यातील हाजीनचा रहिवासी असून, त्याचं खरं नाव मेहराजुद्दीन राथर आहे. काही काळापूर्वी बांदीपोरा येथील दहशतवादी संघटनेत स्थानिक मुलांची भरती करण्यात गुंतला होता.