फॅशनेबल कपड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या मुंबईतील फॅशन स्ट्रीट येथील दुकानांना शनिवारी दुपारी अचानक आग लागली. आगीचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नसले तरी ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ६ गाड्या रवाना झालेल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. जीवितहानी झाल्याचे वृत्त अद्याप नाही. पण या आगीत दुकानांचे मोठे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबईतील अत्यंत गजबजलेल्या भागात चर्चगेटजवळील आझाद मैदानाला लागून असलेले असलेल्या फॅशन स्ट्रीटवर मोठ्या प्रमाणावर कपड्याची दुकाने आहेत. ही सर्व दुकाने एकमेकांना लागून आहेत. दुपारी अचानक एका कपड्याच्या दुकानाला आग लागली. सर्व दुकाने लागन असल्याने म्हणता म्हणता ही आग भडकत गेली. आग आणि धुराचे लोट आकाशात दिसत होते. अन्य दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडायला नकोत म्हणून अग्निशमन दलाच्या गाड्या आग विझवायचा कसोशीने प्रयत्न करीत आहेत.
हे ही वाचा:
नवाब मलिक यांची एवढी संपत्ती होणार जप्त
मुंबई पोलिसांच्या ‘ऑपरेशन रीयुनाईट’ची यशस्वी कामगिरी
भारताने कुवेतला कुवत दाखवत जिंकले सुवर्ण
ठाकरेंना सोडवेना अनैसर्गिक नात्याचा मोह…
फॅशन स्ट्रीट हा भाग फॅशनेबल कपड्यांच्या खरेदीसाठी ओळखला जातो. शनिवारी, रविवारी येथे कपडे खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. फॅशन स्ट्रीटच्या आसपास अनेक कार्यालयांच्या इमारती देखील आहेत. आग लागल्यानंतर पोलिसांनी आगीच्या ठिकाणची वाहतूक थांबवून संपूर्ण रस्ता निर्मनुष्य केला आहे. या आगीत किमान १० ते १२ दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. आगीमुळे या दुकानांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.
डोंबिवलीत एका इमारतीच्या १५ व्या मजल्यावर आग
डोंबिवली परिसरात एका इमारतीच्या १५व्या मजल्यावर आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, ९० फूट अंतरावरील सर्वोदय हिलच्या इमारतीत ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या डोंबिवलीत दाखल झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला तळमजल्यावरील मीटर बॉक्समध्ये आग लागली होती, जी नंतर इमारतीच्या १५ व्या मजल्यावर विजेच्या तारांद्वारे पोहोचली. मात्र, या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.