मोरबीचा १३० वर्ष जुना पूल कोसळल्याची बातमी देशभरात वाऱ्यासारखी पसरली होती. ही बातमी येताच पोलिस आणि प्रशासनासोबत स्थानिक लोकही बचावकार्यात सहभागी झाले होते. क्षणाचाही विचार न करता दोन भावंडानी मदतकार्यासाठी अपघाताच्या ठिकाणी धाव घेतली. पण मदतकार्य करत असताना या दोघांसमोर आले ते त्यांच्याच मुलांचे मृतदेह.
मोरबीमधील झुलता पूल कोसळला तेव्हा त्या पुलावर जवळपास पाचशे लोक होते. एवढी मोठी दुर्घटना झाल्याने घटनास्थळी त्वरित मदतकार्य सुरु झाले होते. त्याच वेळी गणपत राठोड आणि त्यांचा भाऊ मनू राठोड हे बचावकार्य करण्यासाठी तिथे दाखल झाले होते. नदीमधून मृतदेह बाहेर काढण्यासाठी ते प्रयत्न करत होते. मृतदेह बाहेर काढत असताना गणपत यांना त्यांच्या मुलाची मोटरसायकल पुलाच्या गेटजवळ दिसली आणि त्यांचे भानच हरपले. गणपत यांनी जे बारा मृतदेह नदीतून बाहेर काढले होते त्यामध्ये त्यांच्याच मुलाचा मृतदेह असल्याचं कळताच त्यांची शुद्ध हरपली. गणपत यांचा मुलगा इथे आला आहे तर त्याचा भाऊ जगदीश हासुद्धा त्याच्यासोबत आला असल्याची मनू यांना या गोष्टीची जाणीव झाली होती.
हे ही वाचा:
नवाब मलिक यांची एवढी संपत्ती होणार जप्त
मुंबई पोलिसांच्या ‘ऑपरेशन रीयुनाईट’ची यशस्वी कामगिरी
भारताने कुवेतला कुवत दाखवत जिंकले सुवर्ण
ठाकरेंना सोडवेना अनैसर्गिक नात्याचा मोह…
गणपत आणि मनू यांना प्रत्येकी एक मुलगा होता. त्यांची आर्थिक स्थितीही बेताची होती. गणपत हे गवंडी तर मनू हे कारागीर आहेत. गणपत यांच्या मुलाची नुकतीच होमगार्ड नोकरीसाठी निवड झाली होती. तो १ नोव्हेंबरपासून रुजू होणार होता आणि दुर्घटनेच्या आधीच त्याला त्याचा गणवेश मिळला होता. तर मनू यांचा जगदीश याला कपड्यांच्या दुकानात नोकरी मिळाली होती, अशी माहिती मनू यांनी दिली आहे. दरम्यान, जगदीश आणि विजय हे दोघेही वीस वर्षाचे होते. कुळीनगर भागात ते दोघे लहानाचे मोठे झाले होते.