भारत देश स्वतंत्र होऊन ७५ वर्ष पूर्ण झाली. भारत देश आधुनिक दिशेने वेगाने वाटचाल करीत आहे. तरी अजूनही अंधश्रद्धा पसरवणाऱ्या किंवा अंधश्रद्धेला बळी पडणाऱ्या नागरिकांची संख्या कमी झालेली दिसत नाहीये. अशिक्षितांसोबत शिक्षित वर्गही या कर्मकांडाच्या क्रियेला बळी पडताना दिसत आहेत. पूर्वी चार भिंतीच्या आत होणारे कर्मकांड आता खुलेआम ऑनलाईन पद्धतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून अद्भुत आणि चमत्कारी शक्तीचा दावा करणारे व्हिडिओ दाखवून सामान्य लोकांची दिशाभूल करून आर्थिक फसवणूक करणारा नालासोपारा येथील तांत्रिक दिनेश्वर महाराज उर्फ दिनेश पटेल याचा न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्याने भोंदूबाबा फसार झाला आहे. सध्या त्याचा पोलीस तपास घेत आहेत.
भोंदूबाबा आरोपी दिनेश पटेल यांने यूट्यूबवर अनेक अद्भुत आणि चमत्कारी दावे दाखवणारे व्हिडिओ प्रसिद्ध केले आहेत. त्यामध्ये जादूटोणा, मुठकरण, वशीकरण, भूतप्रेतबाधा, करणी, काळी विद्या, जारण- माराण यासारख्या व्हिडिओमधून भोंदूबाबा दिनेश कोणत्याही समस्या दूर करत असल्याचे सांगितले. इतकेच नव्हे तर त्यांनी या सर्व समस्या संदर्भात भाव पत्रक ही ऑनलाईन प्रसिध्द केले होते. तसेच त्याच्याकडे मुंबई, ठाण्यासह देश विदेशातील अंधभक्त ही समस्येचं निवारण करण्यासाठी येत असतं. त्यांची समस्या ऐकून ते निवारण्यासाठी लाखो रुपये घेत असल्याचे समजते.
संबंधित भोंदूबाबाच्या अंधश्रद्धेचे पितळ उघडं झाल्यावर अंधश्रद्धेविरुद्धात जनजागृती करणाऱ्या राष्ट्रीय अपराध निवारक परिषदेचे अध्यक्ष मोहन कृष्णन यांनी भोंदूबाबा दिनेश पटेल याच्या विरोधात नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. नालासोपाऱ्यातील अचोळे पोलिसांनी दिनेश महाराजांविरोधात ९ एप्रिल २०२२ रोजी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध कायदाअधिनियम २०१३ च्या कलम ३ अन्वय गुन्हा दाखल केला आहे.
हे ही वाचा:
किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात सोमय्या करणार तक्रार
लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही
‘आळशी माणूस ऑफ द इयर’ शोधायचा असेल तर मातोश्रीवर जा
हे समजताच दिनेश महाराज त्याचा आश्रमातून गायब झाला. न्यायालयात अटकपूर्वजामीन अर्ज केला असता तो न्यायालयाने फेटाळून लावला. हे समजताच भोंदूबाबा मध्यप्रदेशात पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. तसेच पोलिस मध्य प्रदेशात जावून अटक करणार आहेत.