एसआरए घोटाळ्या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात निर्मल नगर वांद्रे पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे . फोर्जरी, बनावटी करार, फसवणुकीसाठी भा.द.वि ४२० अंतर्गत गुन्हा एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी चौकशी व कारवाई करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती सोमय्या यांनी ट्विट करून दिली आहे.
किशोरी पेडणेकर यांच्या कथित घोटाळ्या प्रकरणी किशोरीताई पेडणेकर यांनी वरळी गोमाता जनता एस.आर.ए.प्रकल्पात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची फसवणूक करून अनेक गाळे स्वतःच्या ताब्यात घेतले. यासंदर्भात निर्मल नगर पोलीस स्टेशन, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, गृहनिर्माण विभाग, महाराष्ट्र राज्य, तसेच अनेक ठिकाणी तक्रार केल्या. यासंदर्भात तक्रार, एफआयआर दाखल करावी अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.
२०१७ मधील मुंबई महापालिका निवडणुकीत किशोरीताई पेडणेकर यांनी भरलेल्या निवडणूक शपथ पत्रात त्या स्वतः गोमाता जनता एसआरएच्या सहाव्या मजल्यावर राहत आहे असे लिहिले आहे. पेडणेकर यांना कोणताही गाळा वितरित करण्यात आलेला नाही. त्या तेथे झोपडपट्टीत राहत नव्हत्या असे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने स्पष्टता दिली आहे. किशोरीताई पेडणेकर, त्यांच्या परिवाराने अश्याच पद्धतीने स्वतःची किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या नावाने गोमाता जनता एसआरए मधील तळमजल्यावरील गाळा क्र. ४ व गाळा क्र. ५. ही ताब्यात घेतला असे सोमय्या यांनी सादर केलेल्या पुराव्यात म्हटले आहे.
हे ही वाचा:
उपमुख्यमंत्री विठुरायाचरणी! शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं जीवन सुजलाम सुफलाम व्हावं
‘आळशी माणूस ऑफ द इयर’ शोधायचा असेल तर मातोश्रीवर जा
चार कोटींची ‘साडी आणि बूट’ पकडले
हा गाळा अन्य लोकांच्या नावाने असताना श्रीमती किशोरीताई पेडणेकर, त्यांचा मुलगा साईप्रसाद पेडणेकर, त्यांची कंपनी किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांनी खोट्या पद्धतीने या गाळ्यावर कब्जा करून त्याचा वापर करत होते / आहे. या संदर्भात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने या तीनही गाळ्यांच्या विरोधात नोटिसेस दिल्या आहेत. फसवणुकीने हे गाळे पेडणेकर परिवार वापरत आहेत म्हणून कारवाई करण्याचा आदेश दिला आहे असेही सोमय्या यांनी आपल्या सादर केलेल्या पुराव्यात म्हटले आहे.
#SRA एस आर ए घोटाळा. मी #किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात निर्मल नगर वांद्रे पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. फोर्जरी, बनावटी करार, फसवणूक साठी आयपीसी IPC 420 अंतर्गत गुन्हा एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे
पोलिसांनी चौकशी, कारवाई करण्याचे आश्वासन दिले@BJP4Maharashtra pic.twitter.com/TVvLJ52ROC
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) November 4, 2022
मी सगळे पुरावे दिले आहेत, मला पोलिसांनी आश्वासन दिलं आहे. की मी जे पुरावे दिलेले आहेत त्याच्यासंबधीत विभागांशी मग तो झोपडपट्टी प्राधीकरण असो, कंपनी मंत्रालय, मुंबई महापालिका निवडणूक आयुक्त या सगळ्यांशी ते चर्चा करून कागदपत्रे मागवणार आहेत आणि त्यानंतर पुढील कारवाई करणार. मरीनलाईन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. मंत्रालयाकडून मला आश्वासन मिळालं आहे, पोलिसांनी जर मंत्रालय आणि अन्य विभागाशी संपर्क साधला तर जे वास्तव आहे ते पोलिसांसमोर मांडणार असे सोमय्या यांनी म्हटले आहे.