23 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरसंपादकीय'सामना'च्या पहिल्या पानावरील जाहिरातीमुळे भगवंत मान आठवले

‘सामना’च्या पहिल्या पानावरील जाहिरातीमुळे भगवंत मान आठवले

घटनाबाह्य सरकारकडून जाहिरात का घेतली

Google News Follow

Related

केवळ भाजपा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यापुरता उरलेल्या ‘सामना’च्या पहिल्या पानावर आज शिंदे फडणवीस सरकारची जाहिरात झळकली, त्यावरून राजकीय वर्तुळात गदारोळ सुरू आहे. मनसेने शिवसेना उद्धव गटाला धारेवर धरले आहे. एखाद्या वर्तमान पत्राला सत्ताधारी सरकारने एखादी जाहीरात दिली तर त्यात एवढा गदारोळ कशाला असा सवाल कोणी उपस्थित करू शकेल. परंतु सामना हे वर्तमान पत्र नंतर आधी मुखपत्र आहे.

‘सामना’ची मालकी असलेल्या ठाकरे कुटुंबियांना मुळात राज्यात सत्तारुढ असलेल्या सरकारचे अस्तित्वच मान्य नाही. आदित्य ठाकरे हे उठसूठ या सरकारला घटनाबाह्य सरकार म्हणत असतात. खोके सरकार म्हणत असतात. अशा सरकारकडून जाहिराती घेतल्यानंतर जाहिरातींचे खोके एकदम ओके, अशी खिल्ली कुणाला उडवावीशी वाटली त्यात नवल ते काय? मनसेच्या संदीप देशपांडे यांनी ही संधी साधून उद्धव सेनेवर टीका केली. पैसा हाच यांचा देव आहे, असे या जाहीरातीवरून सिद्ध झाले असे संदीप देशपांडे म्हणाले आहेत.

अडचणीच असलेल्या मित्र पक्षाला सावरायला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील पुढे आले. जाहिरातीच्या आतील पानावर जे काही छापलेले आहे, ते पाहाता जाहीरातीची किंमत शून्य ठरते, असे पाटील म्हणाले आहे. पाटीलांच्या लेखी जी काही किंमत असेल पण ती आता ठाकरे यांच्या कंपनीच्या तिजोरीत जमा झाली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांना ही टीका भलतीच झोंबली असावी, मूळ मुद्याला बगल देत खोके घ्यायची सवय मनसेलाच आहे, असा पलटवार त्यांनी केला.

हे ही वाचा:

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पायाला लागली गोळी

पंतप्रधान मोदी आणि एकनाथ शिंदेंची ‘रोजगार मोहीम’

चित्रा वाघ भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी

गुजरातच्या निवडणुकीच्या तारखा ठरल्या; या तारखेला होणार मतदान

 

परंतु या सर्वांपेक्षा भारी प्रतिक्रिया दिली माजी परीवहन मंत्री अनिल परब यांनी. खोके कॅशमध्ये घेतात. जाहीरातीसाठी कॅश घेतलेली नाही, असा खुलासा परब यांनी केला आहे. परब हे वकील आहेत, त्यांनी वकिली थाटात उत्तर देण्याचा प्रय़त्न केला, परंतु ते त्यांना झेपलेले दिसत नाही. खोके जाहीरातीच्या माध्यमातून चेकनेही घेता येतात. म्हणूनच कोविडच्या काळात बाकी वर्तमानपत्रांनी मान टाकली असताना सामनाला साडे अकरा कोटी रुपयांचा नफा झाला. ही रक्कम निश्चितपणे चेकने आली असणार. संजय राऊत यांच्या खात्यातही चेकनेच पैसे आले होते. सुजीत पाटकर याच्या खात्यातही चेकने पैसे आले आहेत. ठाकरेंच्या शेल कंपन्यात आलेली मायाही चेकनेच आली आहे. त्यामुळे खोके फक्त कॅशने येतात या परबांच्या वकीली मुद्यात काडीचा दम नाही.

जेव्हा राज्यात काँग्रेसचे सरकार होते तेव्हाही सामनामध्ये काँग्रेसच्या जाहिराती पहिल्या पानावर छापल्या गेल्या आहेत. पण त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारला ठाकरेंनी घटनाबाह्य ठरवलेले नव्हते. सरकार जरी काँग्रेसचे असले तरी ज्येष्ठ नेते शरद पवार ‘सामना’च्या कार्यकारी संपादकांना पत्राचाळीच्या पुनर्विकासाचे काम मिळावे म्हणून म्हाडाच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेत होते. त्यामुळे सामनाचा विरोध म्हणजे बाहेरुन किर्तन आणि आतून तमाशा अशा प्रकारचा होता.

शिंदे फडणवीस सरकारने पानभर जाहिरात देऊन उद्धव सेनेला पार विवस्त्र करून टाकले आहे. याला पाणी पाजण्याची मोदी शैली म्हणतात. किस्सा फार जुना नाही, त्यामुळे लोकांच्या लक्षात असण्याची शक्यता आहे. मोदी सरकार सत्तेवर येऊन एक वर्ष झाले होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कार्यालयावर सीबीआयची धाड पडली होती. त्यामुळे आम आदमी पार्टीचे नेते रस्त्यावर उतरले होते. संसदेतही याचे पडसाद उमटले.

पक्षाचे एकेकाळचे गाजलेले स्टँडअप कॉमेडीयन जे आज पंजाबचे मुख्यमंत्री आहेत, त्या भगवंत मान यांचे भाषण सुरू होते. मान हे मोदी सरकारविरुद्ध प्रचंड आक्रमकपणे बोलत होते. बोलता बोलता ते सरकारचा निषेध करण्यासाठी वेलमध्ये आले. अचानक त्यांच्या घशाला कोरड पडली. ते पाण्यासाठी इथे तिथे पाहू लागले. ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ त्यांच्या मेजावरील पाण्याचा ग्लास भगवंत मान यांना दिला. मान काही क्षण मोदीविरोध विसरले, त्यांनी ते पाणी गटागट पिऊन टाकले. हायसे वाटल्यानंतर ग्लास खाली ठेवताना त्यांनी मोदींकडे पाहून स्मित हास्य केले. त्यानंतर मान यांनी आपले आक्रमक भाषण पूर्ण केले.

कार्यकारी संपादक तुरुंगात गेल्यानंतर कडकनाथांच्या मदतीने ‘सामना’ चालवला जातोय, रोज उठून भाजपा आणि शिंदे सरकारवर खरी खोटी टीका करणे हा सामनाचा एकमेव उद्योग झाला आहे. मोदी सरकार विरुद्ध सतत ओरड करणाऱ्या सामनाला शिंदे सरकारने दिलेली पानभर जाहिरात पाहून आज भगवंत मान आठवले.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा